आपली लाडाची लेक लग्न होऊन दुसऱ्याच्या घरात जाणार असल्याने अनेक आई-वडील लेकीच्या लग्नात भावुक होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. लग्नात लेकीची पाठवणी करताना प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत लेकीच्या आठवणीने अश्रु तरळतात. पण आपल्या सूनेसाठी एखाद्या सासू-सासऱ्याच्या डोळ्यांत अश्रु जमा झालेले तुम्ही ऐकलं किंवा पहिलं आहे का? फार क्वचितच एखाद्या सासू-सासऱ्याच्या डोळ्यात आपल्या सूनेसाठी अश्रु जमा होतात.
सूनेसाठी एखाद्या सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांत अश्रु जमा होणे ही कोणत्याही सूनेसाठी भाग्याचीच गोष्ट आहे आणि अशीच एक भाग्यशाली अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे. खुशबूच्या लग्नात तिला घरी येताना पाहून तिच्या सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांत अश्रु जमा झाले होते. ही भावुक आठवण स्वत: अभिनेत्रीनेच सांगितली आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ या लोकप्रिय मालिकेमधून खुशबू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत सध्या निशी-नीरज यांचे लग्न होत असून याचनिमित्ताने खुशबूने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी खुशबूने तिच्या लग्नातील ही आठवण सांगितली आहे.
यावेळी खुशबूने ही भावुक आठवण सांगत असं म्हटलं की, “अनेकांना असं वाटतं की, लग्नात मुलं किंवा मुलांकडच्या मंडळीपेक्षा मुली व तिचे आई-वडील खूपच भावुक असतात. पण तसं काही नसतं, लग्न ही मुलांसाठी व मुलांच्या आई-वडिलांसाठीदेखील तितकीच भावुक गोष्ट असते. त्यांच्याकडे एका परक्या घरातील मुलगी येत असते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूपच भावुक गोष्ट असते.”
आणखी वाचा – लेकीची पाठवणी करताना आईला कोसळले रडू, लग्नाला २ महीने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने शेअर केले भावुक क्षण
यापुढे तिने असं म्हटलं की, “माझ्या स्वत:च्या लग्नात रिसेप्शनच्या वेळी जेव्हा संग्राम आणि माझी एन्ट्री झाली तेव्हा माझे पप्पा रडले नाहीत. पण माझ्या सासूबाई रडत होत्या. कारण तेव्हा त्यांना असं वाटलं की, दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरात येणार आहे. तर मी ही खूप नवीन गोष्ट पाहिली की, एखाद्या सूनेसाठी सासूच्या डोळ्यांत अश्रु जमा झाले होते.”