बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने हिंदी मनोरंजनसृष्टीत अल्पवधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या पूजाने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकतीच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकली होती. अभिनेत्री तिच्या स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अशातच काल (१३ डिसेंबर) तिला जीवे मारण्याबद्दलचे वृत्तामूळे ती चर्चेत आली.
पूजा दुबईमध्ये गेली असताना तिथे एका व्यक्तीबरोबर तिचा वाद झाला आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडियासह अनेक माध्यमांवर ही बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. पूजाला जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्यांवर तिच्या चाहत्यांसह अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. अशातच याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
आणखी वाचा – “त्यांना असं रडताना पाहून…”, रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, “जो नट इतकी वर्षे…”
नुकतंच पूजाच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. पूजाच्या टीममधील एकाने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “ही खोटी बातमी कुणी पसरवली हे अद्याप आम्हाला ठाऊक नाही. पण पूजाबद्दलची ही बातमी पूर्णपणे खोटी असून या बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्या व्यक्तीने म्हटले आहे. तसेच अभिनेत्रीला धमकी मिळाली असल्याची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
दरम्यान, पूजा सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती. सलमानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. लवकरच ती शाहिद कपूरबरोबरच्या ‘देवा’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ‘हाऊसफूल ५’ मध्येही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, दिशा पटानी, रविना टंडन यांच्या मुख्य भूमिका आहेत.