बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, प्रकरण नेमकं काय?, अभिनेत्रीची टीम स्पष्टीकरण देत म्हणाली, “धमकी मिळाली असल्याचं…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bollywood actress pooja hegde received death threats team says its fake news know the truth

पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, प्रकरण नेमकं काय?, अभिनेत्रीची टीम स्पष्टीकरण देत म्हणाली, "धमकी मिळाली असल्याचं…"

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने हिंदी मनोरंजनसृष्टीत अल्पवधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या पूजाने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकतीच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकली होती. अभिनेत्री तिच्या स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अशातच काल (१३ डिसेंबर) तिला जीवे मारण्याबद्दलचे वृत्तामूळे ती चर्चेत आली.

पूजा दुबईमध्ये गेली असताना तिथे एका व्यक्तीबरोबर तिचा वाद झाला आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडियासह अनेक माध्यमांवर ही बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. पूजाला जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्यांवर तिच्या चाहत्यांसह अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. अशातच याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

आणखी वाचा – “त्यांना असं रडताना पाहून…”, रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, “जो नट इतकी वर्षे…”

नुकतंच पूजाच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. पूजाच्या टीममधील एकाने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “ही खोटी बातमी कुणी पसरवली हे अद्याप आम्हाला ठाऊक नाही. पण पूजाबद्दलची ही बातमी पूर्णपणे खोटी असून या बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्या व्यक्तीने म्हटले आहे.  तसेच अभिनेत्रीला धमकी मिळाली असल्याची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

आणखी वाचा – “शेवटच्या क्षणीही…” दीराचे निधन झाल्यानंतर प्रिया बेर्डेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो आणि…”

दरम्यान, पूजा सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती. सलमानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. लवकरच ती शाहिद कपूरबरोबरच्या ‘देवा’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ‘हाऊसफूल ५’ मध्येही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, दिशा पटानी, रविना टंडन यांच्या मुख्य भूमिका आहेत.    

Tags: bollywoodbollywood actressentertainmententertainment newsentertainment update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Dhruva Datar Wedding

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम ध्रुव दातारची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्याच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.