शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शेवटच्या क्षणीही…” दीराचे निधन झाल्यानंतर प्रिया बेर्डेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2023 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress prreeya berde shared emotinol post for late actor ravindra

"शेवटच्या क्षणीही…" दीराचे निधन झाल्यानंतर प्रिया बेर्डेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो आणि…”

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल (१३ डिसेंबर) रोजी निधन झाले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते रवींद्र यांनी वयाच्या ७८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. रवींद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट केले होते. मात्र उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र यांच्या जाण्याने सिनेसृष्टीसह त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवींद्र बेर्डेंनी लक्ष्मीकांत बेर्डे व त्यांची पत्नी प्रिया बेर्डे यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमधून काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने प्रिया बेर्डे यांना दुःख झाले असून त्यांनी रवींद्र बेर्डे यांच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये प्रिया यांनी असे म्हटले आहे की, “दादा गेले… खरं तर नात्याने ते माझे मोठे दीर होते. पण मला ते अगदी वडिलांसारखे होते. दादा व वृषाली वहिनी नेहमीच माझ्या पाठीशी आई-वडीलांसारखे उभे होते. मला सख्खा भाऊ नाही. पण एका भाऊबीजेला दादा मला म्हणाले ‘ती आरती घे आणि मला ओवाळ.’ तेव्हापासून त्यांच्यामुळे दरवर्षी भाऊबीज व रक्षाबंधन न चुकता होऊ लागले. फक्त सण साजरे करण्यापुरते नाही तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी माझ्या मोठ्या भावाची कमी खऱ्या अर्थाने पूर्ण केली. दादा आमच्या संपुर्ण बेर्डे कुटुंबाचे आधारस्तंभ होते. घरातला ज्येष्ठ व कर्ता माणूस होते. ते तसे फार कमी बोलत, पण आमच्यात वेगळं बॉंडिंग होतं. अभिनय व स्वानंदी तर त्यांच्या मुलांपेक्षा ही प्रिय होते आणि मुलांचं ही त्यांच्यावर जगावेगळं प्रेम होतं. लहानपणापासून त्यांची सगळी हौसमौज दादांनी अगदी कौतुकाने पुरवली.”

आणखी वाचा – ‘आई कुठे…’चा सेट उभा करण्यासाठी इतकी करावी लागते मेहनत, रुपाली भोसलेने दाखवला Inside Video, म्हणाली, “मालिकेच्या सेटचे घर…”

यापुढे प्रिया यांनी असे म्हटले की, “सगळ्या घरात होतात तशी आमच्यात पण भांडणं व मतभेद होते. पण या सगळयात दादा कधीच पडले नाहीत. बायकांच्या गोष्टीत न पडता अलिप्त राहून त्यांनी सगळ्यांना बांधून ठेवलं. त्यांच्या धाक, दरारा हा अबोल होता, पण तो जाणवेल इतपत होता. घरातला कर्ता पुरुष कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे दादा होते. मागच्या महिन्यात आम्ही सगळे बेर्डे कुटुंब गोव्याला गेलो होतो. अनेक वर्षांनी तो योग जुळून आला होता. पण दादांची तब्येत नेमकी बिघडली. त्यामुळे ट्रिप कॅन्सल करावी असा विचार आम्ही करत होतो. पण मला मुलांबरोबर यायचं आहे यावर दादा ठाम राहिले आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते गोव्याला गेले आणि समाधानी होऊन परतले. शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. दादा तुम्हाला मनःपूर्वक श्रद्धांजली”

आणखी वाचा – आईची तब्येत बिघडली असताना भरत जाधव लगेचच शूटिंग रद्द करुन निघाले अन्…; आई-वडिलांनीच सांगितलं होतं सत्य, म्हणालेले, “घट्ट मिठी मारत त्याने…”

१९६५ पासून त्यांची नाटकांशी नाळ जोडली गेली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘भुतांची शाळा’, ‘चंगू मंगू’, ‘खतरनाक’ यांसारख्या चित्रपटांमधून कायम स्मरणात राहील असं काम केलं. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलं.

Tags: marathi actormarathi actressMarathi newspriya berderavindra berde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Kranti Redkar Husband Birthday

"प्रेम, कठीण काळ…", पतीच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची खास पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "मी त्याच्याशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.