नीना गुप्ता यांनी स्त्रीवादावर केलेलं वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आहे. “महिलांनी नोकरी केली तर बलात्कार होणारच” असं नीना यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया येत आहेत. नीना इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी महिलांच्या लैंगिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे. सेक्स व महिला याबाबत नीना यांनी उघडपणे त्यांचं मत मांडलं. खासकरुन भारतीय महिलांचा त्यांनी यामध्ये उल्लेख केला. नीना नक्की लैंगिक आयुष्याबाबत काय म्हणाल्या हे जाणून घेऊया. (Neena Gupta Talk About Sex Life)
महिलांनो सेक्त फक्त आनंदासाठीच…
लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी महिला व सेक्स याविषयी त्यांनी बोलणं पसंत केलं. नीना म्हणाल्या, “मला महिला आणि सेक्स याबाबत खूप वाईट वाटतं. हे फक्त मी भारताबाबत बोलत आहे. हे मी ९९ टक्के किंवा बहुदा ९५ टक्के महिलांबाबत बोलत आहे. सेक्स फक्त आनंदासाठी असतं हे त्यांना माहितंच नाही. या महिलांच्या मते सेक्सची परिभाषा म्हणजे फक्त पुरुषांना आनंद देणे आणि मुलांना जन्म देणे. मला महिला आणि त्यांच्या शारिरीक इच्छांबाबत खूप दुःख होतं. सेक्स हा शब्दच ओव्हररेटेड आहे”.
आणखी वाचा – “महिला नोकरी करणार तर बलात्कार होणारच”, नीना गुप्तांचं वादग्रस्त विधान, यामागचा हेतू काय?
“किसमुळे प्रेग्नंट होता येतं असं वाटायचं”
पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही जर एक महिला असाल तर तुम्हाला जोडीदार म्हणून एका पुरुषाला शोधावं लागतं. हे आपल्या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलं आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं की, किस केल्यानंतर महिला गरोदर राहते. मला खरंच हे सत्य वाटायचं. आपच्या चित्रपटांमध्ये हेच दाखवण्यात आलं आहे. आपणच बॉस आहोत हेच चित्रपटांनी पुरुषांना शिकवलं. आजही बऱ्याच चित्रपटांमधून पुरुषांना हाच धडा मिळतो”.
“महिला कमावत असल्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढलं”
नीना म्हणाल्या, “महिलांना आता आर्थिक मुभा मिळाल्यामुळे समाजात बरेच बदल दिसत आहेत. महिला कमावत असल्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. यामागचं कारण म्हणजे पुरुषांकडून कोणतीच आर्थिक मदत महिलांना नको असल्याचं निदर्शनास येतं. आधीच्या काळातील महिलांकडे ना शिक्षण होतं ना पैसा. त्यामुळे आहे ते आयुष्य त्या जगत होत्या. आता बऱ्याच महिला पुरुषांपेक्षा अधिक कमावत आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टी बदलत आहेत”. नीना यांच्या या नव्या विधानावर पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.