Rohan Gujar Twins Baby : ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता रोहन गुजर काही महिन्यांपूर्वीच बाबा होणार होता. अभिनेत्याने पत्नीच्या डोहाळ जेवणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अखेर आता अभिनेत्याला जुळी मुलं झाली आहेत. अभिनेत्याने त्याच्या जुळ्या मुलांची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहनला गोंडस असा मुलगा आणि एक सुंदर अशी मुलगी झाली आहे. त्याने त्यांना तीन महिने पूर्ण होताच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाहीतर रोहनने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने त्याच्या दोन्ही मुलांची नावं काय ठेवली आहेत याचाही खुलासा केला आहे.
“३ महिने, २ souls आणि १ कुटुंब. आद्या स्नेहल रोहन गुजर, अद्वय स्नेहल रोहन गुजर”, असं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली आहे. यांत त्याने त्याच्या लेकाचा आणि लेकीच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. इतकंच नाहीतर लेकीच नाव आद्या आणि लेकाचा अद्वय ठेवलं असल्याचं घोषित केलं आहे. या शिवाय या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “३ महिने, TWINS” असे हॅशटॅगही त्याने वापरले आहेत.
आणखी वाचा – आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

रोहनने ही आनंदाची बातमी जाहीर करताच सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. शर्वरी लोहोकरे, कौशिक पूर्वा, स्नेहा चव्हाण, साक्षी गांधी, रसिका वेंगुर्लेकर, या कलाकार मंडळींनी रोहनच्या पोस्टवर कमेंट करत चिमुकल्याचं कौतुक करत त्यांना प्रेम दर्शवलं आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी रोहन आणि स्नेहल हे पालक झाले आहेत.
आणखी वाचा – “मला हा नवरा नकोच”, गोविंदाबाबत भलतंच बोलून गेली त्याची पत्नी, म्हणाली, “आता पश्चाताप…”
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे रोहन घराघरांत पोहोचला. या मालिकेतील त्याची पिंट्या ही भूमिका बरीच गाजली. याशिवाय रोहनने ‘बन पाव’, ‘लव लग्न लोचा’, ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत काम केलं.




