गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2026 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Riteish Deshmukh to Bageshwar Baba

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

Riteish Deshmukh to Bageshwar Baba : रितेश देशमुख त्याचा ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘राजा शिवाजी’ प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे, ज्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना बागेश्वर बाबा म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर भाष्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे. रितेशने आता एका नवीन पोस्टमध्ये महान योद्धा राजाबद्दल पसरवलेल्या या ‘अयोग्य आणि दिशाभूल करणाऱ्या’ कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश देशमुखने एक्सवर पोस्ट करत बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. आणि त्यांना खडेबोल सुनावले. त्याने म्हटलं, “कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज”.

आणखी वाचा – “मला हा नवरा नकोच”, गोविंदाबाबत भलतंच बोलून गेली त्याची पत्नी, म्हणाली, “आता पश्चाताप…”

कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील.…— Riteish Deshmukh (@Riteishd) April 26, 2026

नागपुरातील भारदुर्ग शक्तीस्थळाच्या पायाभरणी समारंभात बागेश्वर बाबांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध लढून खूप थकले होते; ते पूर्णपणे तुटलेले होते. एके दिवशी ते रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि खाली ठेवला आणि म्हणाले, ‘मला आणखी युद्ध करायचे नाही.’ तुम्ही या मुकुटाची काळजी घ्या. तुम्ही या राज्याची जबाबदारी घ्या”.

आणखी वाचा – आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि वारशावर आधारित भव्य ऐतिहासिक महाकाव्य आहे. काही दिवसांपूर्वी, ट्रेलर लॉन्चच्या वेळी, रितेश आणि जेनेलिया दोघेही चित्रपटाबद्दल बोलताना भावूक झाले होते. रितेशने नंतर चित्रपट निर्मितीच्या संपूर्ण प्रवासात जेनेलियाला साथ दिल्याबद्दल आभार मानले. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bageshwar Babachhatrapati shivaji maharajriteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Rohan Gujar Twins Baby

'होणार सून मी…' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.