Shivaji Satam Fees : ‘सीआयडी’ या शोचे जगभरात चाहते आहेत. लोकप्रिय शोपैकी एक असा हा शो आहे. हा प्रसिद्ध टीव्ही शो गेल्याच वर्षी टेलिव्हिजनवर परतला. दरम्यान, काही काळ या शोने ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मात्र चाहत्यांच्या आग्रहाखातर हा शो पुन्हा आला. आता या शोबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एसीपी प्रद्युमन या पात्राबाबत ही मोठी बातमी आहे. अभिनेते शिवाजी साटम एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारत आहे आणि आता त्यांचा याशोमधील ट्रॅक संपणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार एसीपी प्रद्युमन आयस्टेट भागातील बॉम्ब स्फोटात मरण पावेल.
‘सीआयडी’ या शोला शिवाजी साटम कायमचा निरोप देणार ही बातमी समोर येताच चाहते थोडे निराश झाले आहेत आणि आता ‘कुछ तो गड़बड़ है दया’ हा त्यांचा डायलॉगही ऐकू येणार नाही. खूप लोकांना हे जाणून आश्चर्य होईल की शिवाजी साटम यांना एका शोसाठी फक्त २० रुपये मिळायचे. शिवाजी साटम यांनी अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीपासून सुरु केली. सुरुवातीच्या दिवसांत, त्यांना नाटकासाठी फक्त २० रुपये मिळायचे. त्यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीला हिंदी चित्रपट पेस्टनजीनंतर खऱ्या अर्थाने वेग आला. ज्यात त्यांना अभिनयासाठी ५०० रुपयांचे मानधन मिळाले.
आणखी वाचा – CID ला शिवाजी साटम यांचा कायमचा निरोप, एसीपी प्रद्युमन यांची अशी एक्झिट का?
१९९८ पासून, ते सीआयडीसह जोडले गेले आणि आता ते या शोमध्ये दिसणार नाहीत. अभिनेत्याने रंगभूमीवर काम करताना २० रुपये कमावले आणि आज टेलिव्हिजन उद्योगातील सर्वोच्च मानधन घेणाऱ्यांपैकी एक आहेत. ‘प्रभात खबर’ या वृत्तवाहिनीनुसार, शिवाजी एसीपी प्रद्युमनची भूमिका निभावण्यासाठी प्रत्येक भागासाठी सुमारे एक लाख रुपये शुल्क आकारत असत. या शोमधील ते नामवंत आणि जुने कलाकार आहेत, आणि त्यांची भारदस्त भूमिका हे मानधन पात्र ठरवते.
आणखी वाचा – कुक असूनही सैफ अली खानच घरात जेवण का बनवतो?, करीना कपूरला अंडी उकडणंही जमेना, स्वतःच केला खुलासा
२००६ मध्ये, शिवाजी साटम यांनी सीआयडी शोच्या एका भागाचे शूटिंग अवघ्या १११ मिनिटांत पूर्ण करुन एक अनोखा विक्रम नोंदविला. हा विक्रम केवळ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच नोंदविला गेला नाही तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंदविला गेला आहे. अभिनेत्याने ‘गर्व: प्राइड एंड ऑनर’, ‘टैक्सी नंबर ९२११’ आणि ‘हसीन दिलरुबा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.