Gayatri Datar Wedding : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसले. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई झाल्याचं समोर आलं आहे. बरेच दिवसांपासून अभिनेत्री गायत्री दातारच्या लग्नाची चर्चा रंगलेली दिसली. अशातच आता अखेर गायत्री श्रीकांत चवरेसह लग्नबंधनात अडकली आहे. गायत्रीच्या लग्नातील खास व्हिडीओ आणि काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये गायत्री आणि श्रीकांत यांचा शाही विवाहसोहळा नदीकाठी झाला असल्याचं समोर आलं आहे. गायत्रीचे हळदी, मेहंदी तसेच संगीतचेही अनेक फोटो समोर आले आहेत. नवरी मुलीच्या वेशात गायत्री खूपच सुंदर दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गायत्री आणि श्रीकांत एकमेकांना वरमाला घालताना दिसले. ब्राऊन रंगाच्या काठापदराच्या नऊवारी साडीमध्ये गायत्री खूपच सुंदर दिसत होती. तर गायत्रीला मॅचिंग असा कॉन्ट्रास्ट पोशाख वराने घातला होता. पांढरा सदरा आणि ब्राऊन धोतर आणि फेटा अशा लूकमध्ये श्रीकांत खूप उठून दिसला. गायत्री आणि श्रीकांतच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. पुण्यातील भोर येथे गायत्रीचा लग्नसोहळा पार पडला.
आणखी वाचा – ‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…
गायत्रीच्या लग्नाला सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, अक्षय केळकर ही कलाकार मंडळी उपथित होती. गायत्रीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यात ‘हिरोची एन्ट्री’ झाल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला तिनं आपल्या जोडीदाराचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता, मात्र ख्रिसमसच्या दिवशी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता संपवली. यानंतर आता गायत्री आणि श्रीकांत लग्नबंधनात अडकले असून त्यांचा संसार सुरु झाला आहे.




