जिनिलिया डिसूजा व रितेश देशमुख ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. रितेश व जेनिलिया यांचे लग्न धुमधडक्यात पार पडले होते.. त्यांच्या लग्नासाठी देशभ्रातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता त्यांच्याबद्दलचा एक खुलासा झाला आहे. (genelia deshmukh crying)
जेनिलिया व रितेश यांचे लग्न पारंपरिक पद्धतिने झाले होते. एकत्र कुटुंबामध्ये दोघंही राहत होते. मराठी कुटुंबात आल्याने जिनिलियाने सर्व पद्धती स्वीकारल्या. नवीन लग्न झाले तेव्हा सलवार-कुर्ता घालून तसेच दागिनेदेखील परिधान करत असत. त्याच वेळी जिनिलिया एवढी नटून-थटून का राहत आहे? असा प्रश्न पडत असे. पण जेव्हा तिला हे सगळे सांभाळता आले नाही तेव्हा ती रितेशसमोर रडू लागली होती. हा किस्सा तिने स्वतः सांगितला होता.
हे सगळं सांगताना ती म्हणाली की, “नवीन लग्न झाले तेव्हा मी नेहमी नटून बसायचे. पण नंतर मला हे सगळं सांभाळता आला नाही. मी रितेशच्या समोर जाऊन रडू लागले आणि म्हणाले की मी नेहमी अशी तयार होऊन बसू शकत नाही. पण मी अशी तयार होऊन का बसत आहेस असा प्रश्न देखील रितेशला पडला होता”.
याचबरोबर जिनिलियाने त्यांच्या सुखी संसाराचेही गुपित सांगितले होते. त्यांनी सांगितले की, “मी रितेशबद्दल नेहमीच चांगले बोलेन. जोपर्यंत माझी भांडायची इच्छा नसते तोपर्यंत तो माझ्याशी भांडत नाही. आम्ही एकमेकांना नेहमी समजून घेतो”. तिने नात्याच्या सुरुवातीची परिस्थितीदेखील सांगितली. ती म्हणाली की, “सुरुवातीला आम्ही एकमेकांशी बोलणे टाळायचो. पण असं का व्हायचं हे समजलं नाही. पण आम्ही आमचे नातं खूप छान प्रकारे जपण्याचा प्रयत्न केला”. जिनीलिया व रितेश यांना दोन मुलं असून ते नेहमी संपूर्ण कुटुंबासहित अनेक ठिकाणी स्पॉट केले जाते.