अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. स्वानंदीने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली. स्वानंदी छोट्या पडद्यावर जितकी सक्रिय असते तितकीच तिला गायनाची आवड देखील आहे. स्वानंदी व आशिष हे रिलेशनशिपमध्ये असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकत्र फोटो पोस्ट करत दिली. (Swanandi Tikekar Mangalagaur)
कलाकारांच्या लगीनघाईत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचं लग्न विशेष चर्चेत राहील. अगदी पारंपरिक अंदाजात व शाही थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नातील लूकचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या विवाहसोहळ्यात खास क्षणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले.
लग्नानंतर स्वानंदी व आशिष बरेचदा एकत्र फिरतानाही दिसले. सोशल मीडियावरही दोघे काही ना काही अपडेट देत चर्चेत असतात. अशातच आता स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. स्वानंदीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी होताना पाहायला मिळत आहे. स्वानंदीने तिच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट अधिक लक्षवेधी ठरत आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर लीलाची पहिली मंगळागौर, ऐजेंसाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, “वचन देते मी तुम्हाला…”
स्वानंदीने तिच्या पहिल्या मंगळागौरचे फोटो शेअर करत खास झलक दाखविली आहे. यावेळी स्वानंदीने खास पारंपरिक लूक केलेला पाहायला मिळाला. जांभळ्या रंगाची काठ पदरची सुंदर अशी साडी, केसात घरा नाकात नथ, हातात हिरवा चुडा घालून सुंदर असा स्वानंदीचा मराठमोळा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. स्वानंदीच्या या मंगळागौर स्पेशल पोस्टला अनेकांनी पसंती दर्शविली. याशिवाय सुकन्या मोने, शिवानी बावकर, संचित चौधरी या कलाकार मंडळींनीही कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.