Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. घरात येण्याआधी पासूनच अरबाज व निक्की यांचं जुळतंय असं वाटत होतं. अरबाज व निक्की हे घरात आल्यावरही बरेचदा प्रेमाने एकमेकांशी बोलताना दिसले. दोघांमध्ये प्रेम जुळतंय हे पाहून घरातील इतर स्पर्धकही त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवू लागले. यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले असल्याचं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील या नव्या प्रेमाने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासून निक्की व अरबाज पटेलचा बॉण्ड नेटकऱ्यांच्या व ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे.
नुकताच ‘बिग बॉस’चा कॅप्टन्सीसाठीचा एक प्रोमो समोर आला. यामध्ये स्पर्धक एकमेकांना भिडताना दिसत आहेत. यात सूरज व वैभव यांच्यात तुफान राडा होताना दिसत आहेत. सीट मिळवण्यासाठी सूरज व वैभव एकमेकांसमोर आले असून यामुळे त्यांच्यात जोरदार वाद होत आहेत. यावेळी सूरज वैभवची सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. सूरज व वैभव यांच्या या वादामध्येही इरिनामध्ये पडते आणि सूरजला शांत करते. टास्क झाल्यानंर वैभव इरिनाला घेऊन बाजूला जातो.
यानंतर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणत आहे की,”कालपेक्षा तू आज जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय”. त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते, “फॉरेनची पाटलीन मस्त आहे”. त्यावर निक्की म्हणते,”भाई. तुझं काय चाललंय”. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण व परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की ही वैभवची गेमसाठीची स्ट्रॅटजी आहे हे येणाऱ्या भागांत कळेल.