सध्या अभिनेते मिथुन चक्रवर्ती अधिक चर्चेत आहेत. आजवर ते अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. अभिनयाकडून त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. सध्या ते विधानसभा निवडणुकांसाठी सहभाग दर्शवताना दिसत आहेत. झारखंड विधानसभा निवडणूकीमध्ये उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांच्याबरोबर एक प्रसंग घडला ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. प्रचारादरम्यान मिथुन यांचे पाकीट लांबवले गेले. याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये मिथुन स्वतः पाकीट माराला पाकीट परत करण्यास सांगत आहेत. नेमके हे प्रकरण काय? नक्की काय घडले? हे आपण आता जाणून घेऊया.(mithun chakraborty stole wallet)
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मंचावरुन एक घोषणा करण्यात येत असलेली दिसून येत आहे. यामध्ये सांगत आहेत की, “तुम्हाला विनंती आहे की ज्याने कोणी मिथुन यांचे पाकीट घेतले असेल तर परत करा”. झारखंड येथे सभेला मिथुन यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. त्यांना भेटण्यासाठी लोक खूप उत्सुक होते. मात्र मंचावरुन त्यांचे पाकीट चोरी झाल्याचे समोर आले. या सभेमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती.
दरम्यान झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अनेक नेते प्राचार करत आहेत. भाजपचे अनेक स्टार प्रचारक मैदानात आले आहेत. मिथुनदेखील प्रचारासाठी पोहोचले होते. त्याचवेळी मिथुन यांचे पाकीट मारले. त्यामुळे मंचावरुन याबद्दलची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी मिथुन यांचे भाषण होताच लगेचच त्यांनी सभा आटोपती घेतली.
मिथुन यांचे पाकीट लांबवल्यानंतर ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते मिळू शकले नाही. स्थानिक भाजपा नेत्यांकडून कार्यवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे मात्र मिथुन यांनी या सगळ्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांपूर्वी मिथुन यांना मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती. मात्र या सगळ्याबद्दल अद्याप अधिक माहिती समोर येऊ शकली नाही.