छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री कविता मेढेकर ‘भुवनेश्वरी’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. शिवानी रांगोळेने ‘अक्षरा’ हे पात्र साकारलं आहे. मालिकेत या सासू-सूनांचे एकमेकांशी पटत नसले किंवा काही कारणावरुन खटके उडत असतील तरी या दोघींचा ऑफस्क्रिन बॉण्ड खूपच छान आहे, दोघी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकींबरोबरचे फोटो शेअर करत असतात. अशातच आज कविता मेढेकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट शेअर करत कविता यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Shivani Rangole Kavita Medhekar Birthday Wishes)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळेने कविता यांच्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने कविता यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “माझ्या ओळखीच्या सर्वात सुंदर आणि प्रेमळ व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ‘नेहमी जे योग्य आहे तेच करा’ ही गोष्ट तुम्ही जगता आणि ती आम्हाला तुम्ही शिकवताही. आपण एकत्र मिळून आणखी अनेक प्रकल्प करू अशी माझी इच्छा आहे”.
शिवानीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खऱ्या आयुष्यात शिवानी आणि कविता मेढेकर यांच्यात खूप घट्ट नात आहे. दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवानीचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त कविता मेढेकर यांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. अशातच कविता यांच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. कविता मेढेकर यांनी आजवर सोज्वळ सुनेचे पात्र साकारले होते. मात्र पहिल्यांदाच त्या नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत.
आणखी वाचा – नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधील जाहिरात वाचून पैलतीर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती. सध्या त्या झी वाहिनीवरील तुला शिकवीण चांगलाच धडा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.