Paaru Marathi Serial Update :’पारू’ या मालिकेत आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, पारूच्या मनाला सतत अहिल्यादेवीबद्दल काळजी वाटत असते. अहिल्यादेवींच्या जीवाला धोका आहे यामुळे पारूचं लक्ष विचलित होतं. आदित्य अहिल्यादेवी सगळेच कामानिमित्त बाहेर जाणार असतात तेव्हा अहिल्यादेवींना मागच्या दाराने घराबाहेर पडायचं हे अहिल्यादेवींना कसं सांगायचं हे पारूला काही कळत नाही. त्याच वेळेला पारू सरबताचा ग्लास घेऊन अहिल्यादेवींच्या रूममध्ये येते आणि मुद्दाम अहिल्यादेवींच्या साडीवर सरबत सांडवते. त्यानंतर अहिल्यादेवी साडी बदलून येतात तेव्हा पारू पुन्हा सरबत घेऊन येते, तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, आता मला नको, मी घाईत आहे. तेव्हा पारू सांगते की, माझ्यासाठी एक गोष्ट कराल का?, तेव्हा अहिल्यादेवी विचारतात, देवाकडे काही मागायचा आहे का?, यावर कारण न सांगता पारू म्हणते की, आज तुम्ही घराबाहेर पडताना घराच्या मागच्या दरवाजांना बाहेर पडाल का?.
हे ऐकल्यावर अहिल्यादेवींना प्रश्न पडतो की, नेमकं पारू असं का बोलत आहे. त्या तिला कारण विचारतात मात्र पारु सांगते की, ‘तुम्हाला माझी शपथ आहे त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यासाठी हे करा आणि आता तुम्ही इथेच बसा. मी सांगेन तेव्हाच तुम्ही घरा बाहेर पडा’. अहिल्यादेवी पारुचं मन जपण्यासाठी हे सगळं काही करतात घराबाहेर पडल्यानंतर अहिल्यादेवी निघून जातात. त्यानंतर महावीर संधी साधून सगळ्या नोकरांना घराबाहेर काढतो आणि घराचं दार लावून घेतो. अहिल्यादेवींच्या तो रूममध्ये जातो तेव्हा पारू अहिल्यादेवींच्या वेशात तिथे उभी असते.
तेव्हा महावीर पारुला पाहतो आणि म्हणतो की, ‘तू खूप पुढे पुढे करत होतीस ना. आता तुझा खेळच मी संपवतो. रोज आपलं अहिल्यादेवी अहिल्यादेवी करत बसतेस. माझ्या मॅडम बरोबर सांगत होत्या. त्यांनी तुझा बरोबर अभ्यास केला आहे’. यावर पारू त्याला तुझ्या मॅडम कोण?, असं विचारते. त्यानंतर पारू आणि महावीरमध्ये बाचाबाची होते. तर इकडे अहिल्यादेवी आणि आदित्य एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा अहिल्यादेवी पारूच्या वागबुकीबद्दल बोलतात.
तेव्हा आदित्यच्या लक्षात येतं की, पारू बोलली म्हणजे घरी नक्कीच काहीतरी सुरु असणार. त्या वेळेला अहिल्यादेवींना सांगून आदित्य तातडीने घराकडे परततो. तेव्हा महावीर पारूला मारणार इतक्यातच पारू आरडाओरडा सुरु करते. अहिल्यादेवी,आदित्य सगळे घरी येतात तेव्हा पारू महावीरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते. ते ऐकून अहिल्यादेवी, आदित्य यांना धक्का बसतो. पुन्हा एकदा पारू किर्लोस्कर कुटुंबाच्या मदतीला धावून आली असल्याचं पाहायला मिळालं आहे.