बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस आयराच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेले काही दिवस लग्नामुळे चर्चेत असणारी आयरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. (Ira Khan Trolled For Her Look)
आयरा-नुपूर आज कोर्ट मॅरेज करणार असून लग्नाच्या तयारीसाठी आयरा ही पार्लरमध्ये पोहोचली आहे. सोशल मीडियावर आयराचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ती सलूनच्या बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये आयरा ही अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने मिनी स्कर्ट आणि टी-शर्ट घातला होता. त्याचबरोबर डोक्यावर तिने ‘ब्राइड टू बी’चा हेअरबॅंड ही परिधान केला आहे आणि या लुकवर आयराने कोल्हापुरी चप्पल परिधान केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण?, करतो ‘हे’ काम, बड्या सेलिब्रिटींशी खास नातं अन्…
आयराच्या या व्हिडीओमुळे नेटकरी हैराण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आयराचा या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने असे म्हटले आहे की, “बॅचलर पार्टीचा बँड काढायला विसरली आहे वाटतं?”, तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “तुम्ही अजूनही हा बालपणीचा पोशाख परिधान केला आहे का?” तसेच “हिचं आज लग्न आहे हे हिला माहीत आहे ना?, आमिर खानसाठी खूप वाईट वाटत आहे, लग्नाच्या दिवशी असे कपडे कोण घालतं?” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आयराला ट्रोल केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव
दरम्यान, आयरा-नूपुर हे आज म्हणजेच ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेलमध्ये शाही पध्दतीने विवाहबद्ध होणार आहेत. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान यांच्या लग्नानिमित्त दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्लीमध्ये आणि दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.