बॉलिवूडमधील परफेक्ट अभिनेता म्हणून अमीर खानचे नाव घेतले जाते. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने काही निवडकच चित्रपट केले मात्र त्याहया सर्वच चित्रपटांना खूप पसंती मिळाली आहे. परंतु तो व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला. काही महिन्यांपूर्वी त्याने दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला. किरण रावबरोबर घेतलेल्या घटस्फोटामुळे त्याच्याबद्दल मोठया प्रमाणात चर्चादेखील झाली. अशातच आता तो तिसऱ्यांदा लग्न करणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले. (aamir khan on third marriage)
आमीर १९८६ साली रिना दत्ताबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांनाही जुनैद व इरा ही मुलं आहेत. मात्र २००२ साली दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तो किरणबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांनाही आझाद नावाचा मुलगा आहे. सरोगसी पद्धतीने आझादचा जन्म झाला. मात्र २०२१ मध्ये किरण व आमीरने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर दोघांनाही अनेकदा एकत्रित स्पॉट केले गेले. आमीरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी त्याने पुन्हा एकदा लग्न करण्याबद्दल विचार करत आहे का? असं विचारलं. त्यावर तो म्हणाला की, “मी आता ५९ वर्षांचा झालो आहे”.
पुढे तो म्हणाला की, “मला नाही वाटत की मी आता पुन्हा लग्न करु शकेन. मला हे सगळं आता कठीण वाटतं. यावेळी माझ्या आयुष्यात माझी खूप नाती आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाबरोबर जोडला गेलो आहे. माझी मुलं आहेत, भाऊ-बहिणी आहेत. जे माझ्या जवळचे आहेत त्यांच्याबरोबर मी खुश आहे. मी सध्या चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत आहे”.
आमीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या नवीन चित्रपटामध्ये व्यस्त आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाच्या सिक्वलची निर्मिती करत आहे. नवीन चित्रपटाचे नाव ‘सितारे जमीन पर’ असे आहे. याचित्रपटात जिनिलिया डिसुजा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.