‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेत अचानक सात वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळाला. आणि लिपनंतर मालिकेला एक वळण आलेलं पाहायला मिळालं. या मालिकेमुळे अप्पी म्हणजेच शिवानी नाईक आणि अर्जुन म्हणजेच रोहित परशुराम घराघरांत पोहोचला. या मालिकेमुळे रोहितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. रोहित अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (Rohit Parshuram Daughter Name Ceremony)
खऱ्या आयुष्यातील अपडेट तसेच त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतो. अशातच रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहितने शेअर केलेली ही पोस्ट एका खास व्यक्तीबरोबरची आहे. ती व्यक्ती म्हणजे त्याची लेक रुई. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लेकीच्या बारशाचा आणि अन्नप्राशनचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे.
रोहितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहितची लेक रुईचा बारसा आणि अन्नप्राशन सोहळा पार पडताना दिसत आहे. यावेळी रुई खूप खुश दिसत आहे. तर रुईचे आई-बाबाही अगदी आनंदाने सार करताना दिसत आहेत. अगदी जवळचे नातेवाईक, कुटुंबीय यांच्या उपस्थितीत रोहित व पूजाने त्यांची लेक रुईचा बारसा आणि अन्नप्राशन सोहळा साजरा केला. रोहितने लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने तिचा चेहरा साऱ्यांना दाखवला होता. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत रुईच कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – नीना गुप्ता यांच्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा शाही थाट, बॉलिवूड कलाकारांची गर्दी, फोटो व्हायरल
रोहित व पूजाची मैत्री कॉलेजपासून सुरु झाली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असं असून ती एक मॉडेल म्हणून ओळखली जाते. पूजा मुळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले आहे. तिला सुरुवातीपासूनच मॉडलिंगमध्ये रस होता. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत तिने अनेक पारतोषिकेही जिंकली आहेत. २०१८च्या ‘मिस्टर इंडिया वर्ल्ड वाईड’च्या अंतिम फेरीपर्यंतही तिने मजल मारली होती.