Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये स्पर्धकांचा दंगा पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर त्याने स्पर्धकांची चांगलीच पोलखोल केलेली दिसली. स्पर्धकांचे खरे चेहरे आणत त्यांना योग्य ती दिशा दाखवण्याचं काम ‘बिग बॉस’च्या भाऊच्या धक्क्यावर करण्यात आलं. चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का विशेष गाजला. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने टीम एची चांगलीच शाळा घेतली. स्पर्धकांची शाळा घेतल्याने अनेकांचे डोळे उघडले आणि स्पर्धकांमध्ये फाटाफूट झाली. निक्की समोर टीम ए चा खरा चेहरा आला.
रितेश देशमुखने निक्कीला चक्रव्ह्यूह मध्ये पाठवलं. तेव्हा टीम ए मधील स्पर्धक निक्कीच्या पाठी निक्कीबाबत काय काय बोलतायेत याचा खुलासा झाला आणि ते पाहून निक्कीला खूप मोठा धक्का बसला. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, निक्की चक्रव्यूमधून बाहेर आल्यावर सगळ्यांकडे पाहत जोरजोरात टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते की, “अगदी योग्य अशा ग्रुप ए साठी टाळ्या सर. यांच्या बोलण्यामध्ये दम तर नाही आहे आणि हे हलके लोक आहेत. माझा वादा आहे की मी ग्रुप एला ट्रॉफी उचलू देणार नाही”. तर आर्यासमोरही टीम बीमधील स्पर्धकांचा खरा चेहरा आला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सावधान! Bigg Boss च्या घरातील स्पर्धकांची झोप उडणार, मानकाप्याची एण्ट्रीने आलं मोठं संकट
यानंतर सगळेच स्पर्धक निक्कीच्या विरोधात गेलेले दिसले. तर एकीकडे जान्हवीला शिक्षा म्हणून जेल करण्यात आली आहे. अशातच आता आर्या व जान्हवी एकत्र येत निक्कीबाबत गॉसिप करताना दिसत आहेत. निक्कीबरोबर आता जान्हवी बोलणार नसल्याचं या प्रोमोमधून समोर आलं आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आर्या जान्हवीला म्हणते, “या सगळ्या गोष्टींचा तू विचार करत आहेस की, तुला निक्कीबरोबर बोलायचं नाही आहे. परवापर्यंत तुझा हा विचार नव्हता आणि क्षणार्धात तू निर्णय बदलला. हा बदल तुझ्यात होऊ शकतो तर तुझं व्यक्तिमत्त्व नेमकं काय आहे हे तू दाखवून देऊ शकते”.
आणखी वाचा – Asha Sharma passes away : ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यावर जान्हवी आर्याला असं म्हणाली की, “तुला सांगू माझा गेम काय असणार हे ठरलं होतं. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या विरोधात जाऊन कचाकच भांडू शकते”. यावर आर्या म्हणाली, “आज मी निक्कीला हे तोंडावर बोलले आहे. तिला तुझी सावली का म्हणतात. आता सगळ्यांना तुझी ऍक्शन पाहायची आहे की नक्की जान्हवी काय आहे”.