शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bollywood actor aamir khan daughter ira total net worth see the details

आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्...

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची लेक आयरा खान ही आज बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईमध्ये ताज एण्ड्स लँड या अलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आयरा व नुपूर हे २०२० पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या व नुपूरच्या नात्याविषयी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. आयरा ही आमिरची  मुलगी असूनही ती एक स्वतंत्र व स्वत:च्या पायावर उभी राहणारी एक खंबीर मुलगी आहे.  (Ira Khan On Instagram)

आयरा खानचा जन्म १७ ऑगस्ट १९९७ रोजी झाला असून आता तिचे वय २७ वर्ष आहे. मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयराने युनिव्हर्सिटी कॉलेज उट्रेचमध्ये उच्च शिक्षण घेतले. ‘युरिपाइड्स मेडिया’ या नाटकाद्वारे तिने दिग्दर्शनात पदार्पण केले. आयरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आयरा ही सोशल मीडियावरील तिच्या नैराश्याच्या चर्चामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना तिने चकाकणाऱ्या ग्लॅमरच्या दुनियेमागे सगळेच स्वप्नवत नसते हे सांगण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला घेऊन प्रसाद खांडेकरचा नवा चित्रपट, स्वप्निल जोशी व प्रार्थना बेहरेही महत्त्वाच्या भूमिकेत

आयरा ही झोया अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक म्हणून कामदेखील करत होती. यानंतर इराने ‘अगत्सू’ नावाची एक संस्थादेखील स्थापन केली आहे. ही संस्था मानसिक आरोग्यासंबंधित काम करते. याचबरोबर ए.बी.पी.च्या वृत्तानुसार मुंबईत आयराच्या मालकीचे एक अपार्टमेंटदेखील आहे. तर काही मीडिया रिपोर्टसनुसार, आयरा ही जवळपास तीन मिलियन डॉलरच्या संपत्तीची मालकीण आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार, ही किंमत जवळपास अडीच ते तीन करोड रुपये इतकी आहे.   

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीचं धुमधडाक्यात नव्हे तर कोर्टात होणार लग्न, रिसेप्शन सोहळ्यासाठी अभिनेता करणार अवाढव्य खर्च

दरम्यान, नूपुर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. २०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि अखेर आयरा-नूपुर हे दोघे आज एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.   

Tags: aamir khanbollywood newsentertainment newsira khanIra khan and nupur Shikhare Weddingira khan weddingIra Khan-Nupur Shikhare Wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
pur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : नवरी नटली पण आमिर खानच्या जावयाने जिमच्याच कपड्यांमध्ये केलं लग्न, अनेक पाहुणेही होते उपस्थित, खास लूकची सोशल मीडियावर चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.