सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : नवरी नटली पण आमिर खानच्या जावयाने जिमच्याच कपड्यांमध्ये केलं लग्न, अनेक पाहुणेही होते उपस्थित, खास लूकची सोशल मीडियावर चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 9:49 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
pur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

आयरा खान-नुपूर शिखरे लग्न

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. अशातच काल (3 जानेवारी) रोजी दोघांचे नोंदणी पद्धतीने लग्न पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयरा-नुपूर यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबीय, मित्रपरिवार व काही खास लोकांनी देखील हजेरी लावली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांनीही पत्नी नीता अंबानीसह या लग्नाला विशेष हजेरी लावली होती. (Nupur Shikhare and Ira Khan Marriage)

गेले काही दिवस आयरा-नुपूर यांचे लग्न विशेष चर्चेत होते. गेले काही दिवस त्यांच्या घरात लग्नानिमित्त अनेक विधी व सोहळे होत असल्याचे पाहायला मिळाले. नुकताच त्यांचा हळदी समारंभ झाला, यात किरण राव व रीना दत्त यांनी केलेल्या मराठमोळ्या लूकमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. अशातच आता लग्नात आयरा-नुपूर यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे हे दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्…

आयरा खानने लग्नात धोती चोली ड्रेस परिधान केला होता. तर नुपूर मात्र त्याच्या लग्नात बनियान व शॉट्सवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आयराची आई रीना यांनी पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तर आमिरने लेकीच्या लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता, धोती आणि त्यावर गुलाबी रंगाचा फेटा परिधान केला होता. तर किरण रावने आयराच्या लग्नात सोनेरी रंगाच्या साडी नेसली होती. तर, नुपूर शिखरेच्या आई प्रीतम शिखरे यांनी लेकाच्या लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. 

आयरा-नुपूर यांच्या लग्नात अनेक पाहुण्यांची वर्णी लागली असल्याचे पाहायला मिळाले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आयरा-नुपूर यांच्या लग्नाला मुकेश व नीता अंबानी यांनी देखील वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी खास हजेरी लावली होती. मुकेश व नीता अंबानींचे आमिरने खास स्वागत केल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. याशिवाय या लग्नाला आणखीही बरेच पाहुणे उपस्थित होते.

आणखी वाचा – “शोमधून बाहेर आल्यानंतर…”, अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर घटस्फोटाचा निर्णय घेणार?, म्हणाली, “मी निर्णय घेईन तेव्हा…”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयरा-नुपूर यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती आणि अखेर ही जोडी आता विवाहबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं असून त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळेल. या रिसेप्शन सोहळ्यात शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व मोठे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: Amir Khan Latest Marathi NewsBollywood Celebrity Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare HaldiIra Khan-Nupur Shikhare Marriage Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare WeddingIra Khan-Nupur Shikhare Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare Wedding PicturesIra Khan-Nupur Shikhare Wedding Videos PhotosKiran Rao Marathi NewsReena Dutt Marathi NewsWho is Nupur Shikhareअमीर खान ताज्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्न बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे फोटोआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाच्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे वेडिंगआयरा खान-नुपूर शिखरे हळदीकिरण राव बातम्याकोण आहे नुपूर शिखरेबॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या मराठी बातम्यारीना दत्त बातम्या
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानच्या लेकीच्या लग्नात दोन मराठमोळ्या कलाकारांचीच हवा, वरातीमध्ये नाचले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.