‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची लेक आयरा खान ही आज बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईमध्ये ताज एण्ड्स लँड या अलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आयरा व नुपूर हे २०२० पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या व नुपूरच्या नात्याविषयी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. आयरा ही आमिरची मुलगी असूनही ती एक स्वतंत्र व स्वत:च्या पायावर उभी राहणारी एक खंबीर मुलगी आहे. (Ira Khan On Instagram)
आयरा खानचा जन्म १७ ऑगस्ट १९९७ रोजी झाला असून आता तिचे वय २७ वर्ष आहे. मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयराने युनिव्हर्सिटी कॉलेज उट्रेचमध्ये उच्च शिक्षण घेतले. ‘युरिपाइड्स मेडिया’ या नाटकाद्वारे तिने दिग्दर्शनात पदार्पण केले. आयरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आयरा ही सोशल मीडियावरील तिच्या नैराश्याच्या चर्चामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना तिने चकाकणाऱ्या ग्लॅमरच्या दुनियेमागे सगळेच स्वप्नवत नसते हे सांगण्याचा प्रयत्न केला.
आयरा ही झोया अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक म्हणून कामदेखील करत होती. यानंतर इराने ‘अगत्सू’ नावाची एक संस्थादेखील स्थापन केली आहे. ही संस्था मानसिक आरोग्यासंबंधित काम करते. याचबरोबर ए.बी.पी.च्या वृत्तानुसार मुंबईत आयराच्या मालकीचे एक अपार्टमेंटदेखील आहे. तर काही मीडिया रिपोर्टसनुसार, आयरा ही जवळपास तीन मिलियन डॉलरच्या संपत्तीची मालकीण आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार, ही किंमत जवळपास अडीच ते तीन करोड रुपये इतकी आहे.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीचं धुमधडाक्यात नव्हे तर कोर्टात होणार लग्न, रिसेप्शन सोहळ्यासाठी अभिनेता करणार अवाढव्य खर्च
दरम्यान, नूपुर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. २०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि अखेर आयरा-नूपुर हे दोघे आज एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.