‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व खूपच चर्चेत आलं आहे. यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क सुरु असताना दोन्ही टीममध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. यावेळी जान्हवीने पॅडी यांच्या अभिनयावरुन अपमान केला. तसेच याआधीही जान्हवीने वर्षा उसगांवकर यांचादेखील आपमान केला होता. या सगळ्यायावरुन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. (siddharth jadhav on pandharinath kamble)
दरम्यान पॅडी यांच्या अभिनयावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकार पॅडीसाठी पुढे येत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त करत आहेत. विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, मेघा धाडे यांनी पोस्ट केल्या आहेत. अशातच आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “जोकर…बरं मग.. ओव्हर ॲक्टिंग…बरं मग…पण या ओव्हर रिॲक्टिंग करणाऱ्या जोकरचा ‘संयम’ दिसत नाही का तुला? एकदा तो सुटला ना की तुझी ‘बिग बॉस मराठी’मधील ओव्हर ॲक्टिंगवाली जोकरगिरीपण दिसणार नाही. याला म्हणतात ‘अनुभव’. तुझ्यासारखी कितीही (जा) नवी लोकं आली ना. तरीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जुनं तेच सोनं असतं आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणार”.

ही स्टोरी शेयर करत सिद्धार्थने ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील ‘कहता है जोकर सारा जमाना’ हे गाणं त्यामागे लावलं. सिद्धार्थच्या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टचे स्क्रीनशॉट्सदेखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तसेच मेघा धाडेनेदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे, ती म्हणाली की, “तुझी लायकी किती?, तू बोलते किती?. तुझ्यासारखी घाणेरडी स्पर्धक आम्हाला झक मारुन बघायला लागत आहे. यामागचं कारण म्हणजे आमहाला टीम बीला बघायला आवडतं. याचमुळे आमची मजबुरी आहे की आम्हाला तुझं तोंड बघायला लागत आहे. चीप जान्हवी”. अगदी सडेतोड शब्दांबमध्ये मेघाने जान्हवीवरचा राग इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्यक्त केला.