Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ म्हणजे तारेवरची कसरत. स्पर्धकांचे खरे चेहरे यामधून प्रेक्षकांच्या समोर येतात. या शोमध्ये येणं म्हणजे स्पर्धकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असणं गरजेचं असतं. स्वतःवर नियंत्रण ठेवणं ज्याला जमलं तोच या शोचा खरा राजा असंच चित्र आजवर दिसत आलं आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये काही स्पर्धकांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण न ठेवता काहीही बोलणं ही जणू त्यांची सवयच झाली आहे. यामध्ये जान्हवी व निक्की टॉपला आहेत हे बोलणं वावगं ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जान्हवीकडून मोठी चूक घडली. तिने पॅडीच्या कामाचा अपमान करत अपशब्दही वापरले. आता यावरुनच प्रकरण चांगलं तापलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
पॅडीच्या अभिनयाला ओव्हरएक्टिंग म्हणत जान्हवीने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. त्याचबरोबर निक्कीनेही पॅडीला जोकर म्हटलं. यावरुन अनेक मराठी कलाकारांनी जान्हवी तसेच निक्कीच्या विरोधात सोशल मीडियाद्वारे विविध पोस्ट केल्या आहेत. फक्त कलाकाराच नव्हे तर प्रेक्षक मंडळीही संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ फेम मेघा धाडेने जान्हवीला खडेबोल सुनावले आहेत. तिने तीव्र संताप व्यक्त करत खरी बाजू मांडली आहे.

मेघा म्हणाली, “तुझी लायकी किती?, तू बोलते किती?. तुझ्यासारखी घाणेरडी स्पर्धक आम्हाला झक मारुन बघायला लागत आहे. यामागचं कारण म्हणजे आमहाला टीम बीला बघायला आवडतं. याचमुळे आमची मजबुरी आहे की आम्हाला तुझं तोंड बघायला लागत आहे. चीप जान्हवी”. अगदी सडेतोड शब्दांबमध्ये मेघाने जान्हवीवरचा राग इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्यक्त केला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “विकून खाशील, तुझ्या देशाने रिजेक्ट केलं म्हणून…”, इरिनावर निक्कीचे आरोप, दमदाटी सुरुच
‘बिग बॉस मराठी’मध्ये एखाद्याच्या करिअरवर बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जान्हवी सूरज, आर्या यांना नको नको ते बोलली. अजूनही कोणताही टास्क समोर आला की, तिची भूमिका ही वेगळीच असते. शिवाय निक्कीने तर वर्षा उसगांवकर यांच्याबाबत बोलताना सगळ्याच मर्यादा ओलांडल्या होत्या. कोणाच्याही कामाचं, वयाचं भान न ठेवता दोघीही घरात वाट्टेल ते बोलतात. आता या भाऊच्या धक्क्यावर नक्की रितेश कोणतं पाऊल उचलणार? आणि पॅडीच्या मुद्द्याला योग्य न्याय मिळणार का? हे पाहावं लागेल.