सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवं पर्व खूप चर्चेत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक चर्चेत आला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आहे. या पर्वात प्रसिद्ध रीलस्टार, युट्यूबर धनंजय पोवार यामध्ये आला आहे. कोल्हापुरी बाज, रांगडी भाषा, मानमोकळेपणा यामुळे त्याला प्रेक्षकांची अधिक पसंती पडत आहे. त्यांची बोलण्याची विनोदी शैली ही अधिकच लोकांना आवडत आहे. ‘बिग बॉस…’च्या घरात धनंजय इरिना, अंकिता तसेच निक्कीबरोबर थट्टा-मस्करी करताना दिसतो. अशातच आता धनंजयच्या आई व बायकोची मुलाखत समोर आली आहे. (dhananjay powar in bigg boss marathi)
या वेळी ‘बिग बॉस..’च्या या पर्वात मराठी अभिनेत्री व सोशल मीडियावरील अनेक सेलिब्रिटी कलाकारांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये ‘परदेसी गर्ल’ इरिनाबरोबरही धनंजयचे बॉंडिंग चांगले असलेले दिसून येते. तिच्याबरोबर तो नेहमी मस्करी करत असतो. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होतात.अशातच आता त्याच्या कुटुंबियांबरोबर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी घरात वाइल्ड कार्ड प्रवेश द्यावा अशी भावना व्यक्त केली आहे.
यावेळी पत्रकाराने धनंजय यांचे निक्की व इरिनाबरोबर असलेल्या मैत्रिविषयी विचारले, तेव्हा त्यावर त्याची पत्नी कल्याणी म्हणाल्या की, “या कार्यक्रमामध्ये ते मला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे त्यांनी काहीही केल्यावर माझी काय प्रतिक्रिया असणार आहे ते त्यांना माहीत आहे. त्यांना माझा स्वभाव माहीत आहे”.
पुढे त्या म्हणाल्या की, “मला त्यांची खूप आठवण येते. तेथील सगळेचजण घरच्यांना मिस करत आहेत. कुटुंबीयांना सोडून असं तिथे राहणं चेष्टा नाही. ‘बिग बॉस…’च्या घरातील प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आपल्या माणसांना सोडून इतके दिवस तिथे राहणं कठीण आहे. मला वाइल्ड कार्ड एंट्री द्या. मी आत जाईन आणि त्यांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देईन”. त्यावर धनंजयची आई म्हणते की, “ही आत गेली तर तो उडी मारुन बाहेर येईल. पण आम्ही जर वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन आत गेलो तर कोल्हापुरी ठसकाच सगळ्यांना दाखवून देऊ”. धनंजय सध्या ‘बिग बॉस…’ मध्ये चांगल्या पद्धतीने टास्क पूर्ण करत आहे. तसेच त्याला प्रेक्षकांचीदेखील खुपो पसंती मिळत आहे.