Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या मंगळवारच्या भागात जान्हवी किल्लेकरने टास्कदरम्यान पंढरीना कांबळे यांच्या करिअर व अभिनयाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”. कांबळे यांच्या अभिनय कारकिर्दीला ‘ओव्हर अॅक्टिंग’ म्हटल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही जान्हवीच्या वक्तव्याच्या निषेध केला आणि तिला खडेबोल सुनावले. कलाकार आणि प्रेक्षकांनी चपखल शब्दात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीची कानउघडणी केली. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
अशातच आता जान्हवीने या प्रकरणावर पॅडी यांची माफी मागितली आहे. बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात जान्हवीने कॅप्टन्सी टास्क झाल्यानंतर पॅडी कांबळे यांची माफी मागितली आहे. जान्हवी एकटी रडत बसलेली असताना तिथे धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादा येतात. तिला रडताना पाहून ते तिची समजूत काढतात. यावेळी जान्हवी त्यांना असं म्हणते की, “मी चुकीची वागले. मला आदल्या दिवशी काय केलं याचा दुसऱ्या दिवशी पश्चाताप होतो. मी अतिच बोलते. पॅडी दादांना मी खूप काही बोलून गेले”. यावर डीपी तिची समजूत काढत असं म्हणतात की, “हा खेळ आहे. आपण इथे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत. खेळ आहे म्हटल्यावर हे होणारच. तुझं एकंच चुकतं ते म्हणजे बोलताना भान ठेवलं पाहिजे. तू भांडण करते हे चुकत नाही. चुकतात ते तुझे शब्द. करिअरवर वगैरे बोलणं हे चूक आहे. खूप चुकीचं आहे”.
जान्हवी एकटी बसून रडत असताना पॅडी कांबळे येतात आणि तेव्हा ती त्यांना “मला माफ करा” असं म्हणते. यावर पॅडी कांबळे तिला “कशाबद्दल माफी मागत आहेस?” असं विचारतात. यावर जान्हवी असं म्हणते की, “मी काल तुमच्याबरोबर जे काही वागले त्याच्यासाठी मला माफ करा”. यावर पॅडी असं म्हणतात की, “मला वाटलं होतं हे कधी ना कधी तुला माझ्याशी हे बोलावं वाटेल. तू जे काही बोललीस ते माझ्यासमोर नाही झालं. मला कुणाकुणाकडून कळलं आणि काही ओझरतं ऐकू आलं. तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली होती की, हिला एक मोठी अभिनेत्री बनव आणि तुला माझ्याबरोबर काम करायला लागू नये ही भूमिका घेता येऊदेत. हा माणूस जर माझ्याबरोबर असेल तर मी काम करणार नाही असं तुला म्हणता यावं इयकी मोठी कलाकार तू व्हावीस. कारण मी हे ठरवलं होतं की, एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर जान्हवी असेल तर मी काम करणार नाही. पण मी एकमाणूस आहे, मी एक बाप आहे आणि मी एक भाऊ आहे. तर तू आता शांत हो. नको रडूस”.
यानंतर जान्हवी पुन्हा असं म्हणते की, “मी रागाच्या भरात काय बोलून जाते हे मला खरंच कळत नाही, तेव्हा काहीच सुचत नाही”. यावर पॅडी पुन्हा तिची समजूत काढत असं म्हणतात की, “हाच तर खरा गेम आहे. आपण खुप भांडुयात. एकमेकांचा जीव खाऊन भांडू. पण बोलताना शब्द जपून वापरु. बोलताना विचार केला पाहिजे. एकमेकांचे करिअर, याबद्दल न बोलता. बोलताना एक स्तर सांभाळू आणि एकमेकांचा आदर करू”