Jay Dudhane Wedding: ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. २३ डिसेंबर रोजी जय दुधाणेचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होताना पाहायला मिळाले. अशातच जयच्या घरी आता लगीनघाई सुरु झाली असून त्याच्या लग्नपूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. जय आणि हर्षलाचा नुकताच हळदी समारंभ देखील पार पडला.
जयच्या हळदी समारंभात बिग बॉस मराठीच्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. तृप्ती देसाई जयच्या हळदीला उपस्थित होत्या. त्याच्या हळदी समारंभात डान्सही केला. याचा व्हिडीओ तृप्ती देसाईंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तृप्ती देसाई जय दुधाणे आणि त्याची होणारी पत्नी हर्षला हिला हळद लावताना दिसत आहेत. त्यानंतर हळदीत त्या जयसोबत डान्सही करतात. जयच्या हळदीला लाडक्या दादूसचा ऑर्केस्ट्राही ठेवण्यात आला होता. आता जय आणि हर्षला लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. (Jay Dudhane Wedding)
जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून ती तिच्या फॅशन आणि ट्रॅव्हल संदर्भातील व्हिडिओंसाठी ओळखली जाते. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तर जय दुधाणे MTV स्प्लिट्सविला १३ मध्ये जय झळकला होता. जयनं या शोचं विजेतेपद पटकावून तरुणाईमध्ये मोठी क्रेझ निर्माण केली होती. यानंतर तो बिग बॉस मराठी ३ या शोमध्ये तो उपविजेता ठरला. यानंतर त्यानं काही मराठी मालिकांमध्येही काम केलं. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत आणि ‘गडद अंधार’ सारख्या चित्रपटांत त्याने काम केलं आहे. (Jay Dudhane Wedding)
आणखी वाचा: ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, थेट मेहंदीचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, होणारा नवरा कोण?



