रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही वेगळे झालो आहोत…”, सोळा वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट; म्हणाली, “कधीही लग्नाचं खरं चित्र…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 24, 2025 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sreenanda Shankar Announces Divorce

साऊथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर तनुश्री शंकर यांची मुलगी श्रीनंदा शंकर हिने तिचा पती गेव सतारवालापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Sreenanda Shankar Announces Divorce: २०२५ मध्ये अनेक कलाकारांचे घटस्फोट झाल्याचे समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. राहुल देशपांडे, शुभांगी सदावर्ते यांसारख्या अनेक कलाकारांचा घटस्फोट झाला आहे. अशातच आता वर्षाच्या अखेरीस आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. अशातच आता एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीनंही घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरु पोस्टकरुन अभिनेत्रीनं तिच्या नवऱ्यापासू विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे.

साऊथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर तनुश्री शंकर यांची मुलगी श्रीनंदा शंकर हिने तिचा पती गेव सतारवालापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तब्बल सोळा वर्षांच्या सुखी संसारानंतर श्रीनंदा शंकर आणि गेव सातारवाला यांनी घटस्फोट घेतला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. श्रीनंदाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर 21 डिसेंबर 2025 रोजी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट शेअर करत तिने म्हटलं की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल ज्या अफवा पसरत होत्या, त्या दुर्दैवानं खऱ्या आहेत. आम्ही काही काळापूर्वीच वेगळे झालो होतो, पण, हे सार्वजनिक करण्यापूर्वी आम्हाला स्वतःला थोडा वेळ हवा होता.” (Sreenanda Shankar Announces Divorce)

View this post on Instagram

A post shared by Sreenanda Shankar (@sreenandashankar)

आणखी वाचा: ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा संपन्न, पहिला फोटो समोर, होणारा नवरा आहे सिनेविश्वात कार्यरत

पुढे ती म्हणाली, ” “मी कंटेंट तयार करत राहीन. काहीजण आमचे एकत्र व्हिडीओ मिस करतील, पण कृपया लक्षात ठेवा की, ऑनलाइन घालवलेले छोटे-छोटे क्षण कधीही लग्नाचं खरं चित्र दाखवत नाहीत. तुमच्या सततच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद… मला आता त्याची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे…” गेव सतारावाला-श्रीनंदा शंकर दोघेही सोशल मीडियाद्वारे भेटले आणि आठ महिने एकमेकांसोबत त्यांनी वेळ घालवला. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल पाच वर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केलं. मात्र आता सोळा वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Sreenanda Shankar Announces Divorce)

आणखी वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

Tags: entertainmentGev SatarwallaSreenanda Shankar Announces DivorceSreenanda Shankar marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Jay Dudhane Wedding

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याला लागली हळद, होणाऱ्या पत्नीसह भन्नाट डान्स; लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.