Jay Dudhane Wedding: मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलारकारांची लगीनघाई पाहायला मिळाली. लग्नसराईच्या या काळात अनेकजण बोहल्यावर चढताना दिसले. काही दिवसांपूर्वीच मेघन-अनुष्का, सोहम-पूजा बिरारी, तेजस्विनी लोणारी आणि सूरज चव्हाण, लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता आणखी एका बिग बॉस फेम अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून जय दुधाणे आहे. जयने गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी साखरपुडा केला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. गेल्या अनेक दिवसांपासून जायच्या लग्नाची चारचा रंगताना दिसली. अखेर जय दुधाणे हर्षला पाटीलसह लग्नबंधनात अडकला आहे.
बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे हर्षला पाटीलसह २४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. त्यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या लग्नातील खास लूकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जय दुधाणे आणि त्याची पत्नी हर्षला यांचा लग्नातील पारंपरिक लूक खूपच सुंदर दिसत असून जयने पिवळ्या रंगांचा कुर्ता-धोतर परिधान केलं आहे. तर त्याची पत्नी हर्षला पाटीलने सुंदर अशी पिवळ्या रंगाची सहावारी साडी आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान केला आहे. याचबरोबर यांच्या लग्नसोहळ्यात अनेक कलाकार मंडळी देखील सहभागी होताना दिसली. दरम्यान या पोस्ट्सवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. (Jay Dudhane Wedding)
जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावर्षी मार्च महिन्यात जयने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. हर्षलाला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. (Jay Dudhane Wedding)




