मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनतदेखील घेत असतो. काहींच्या बाबतीत ही स्वप्नपूर्ती होते तर काहींना यासाठी वेळ लागतो. मात्र गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी मुंबईत घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. प्राजक्ता माळी, पृथ्विक प्रताप, केतकी माटेगांवकर यांनी मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे. यात आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अक्षय केळकरचाही समावेश झाला आहे. (Rakhi Sawant’s Comment On Akshay Kelkar)
अक्षयने मुंबईत नवीन घर घेतले असून त्याच्या या नवीन घराची खास झलक त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली होती. “२०२३ मध्ये माझ्या आयुष्यात सगळ्या सुंदर गोष्टी घडल्या. त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःचं घर.” असं म्हणत त्याच्या आधीच्या संघर्षाविषयीदेखील सांगितले होते. दरम्यान, त्याच्या या पोस्टखाली अभिनेत्री समृद्धी केळकर, प्रथमेश परब, योगिता चव्हाण, अक्षया नाईक, सोनाली पाटील, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, शर्मिला शिंदे, सुकन्या मोने अशा अनेक कलाकारांनी अक्षयला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या अनेक चाहत्यांनीदेखील त्याला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र या पोस्टखालील एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाला मोठा फटका, ऑनलाईन झाला लीक
बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने अक्षयच्या पोस्टखाली एक कमेंट केली आहे. तिने केलेल्या या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. राखीने त्याला शुभेच्छा देण्याऐवजी एक सल्ला दिला आहे. तिने “आता लवकर लग्न कर भाऊ” अशी मजेशीर कमेंट करत त्याला लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान तिच्या या कमेंटवर अक्षयने अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही. पण एका नेटकऱ्याने “माहीत आहे ना लग्न झाल्यावर लोकं फसवतात, त्यामुळे सिंगल आयुष्यचं चांगलं आहे मॅडम” असं म्हणत तिच्या कमेंटला उत्तर दिले आहे.
आणखी वाचा – आर्या आंबेकरचा मोठा निर्णय, सोशल मीडियापासूनही दूर राहणार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आपल्या आयुष्यात…”
दरम्यान अक्षयने ‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या पर्वाचे विजतेपद पटकावले होते. त्यानंतर तो कलर्स वाहिनी वरीलच ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात दिसला होता. यात त्याने सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. अशातच आता तो राखीच्या या कमेंटवर काय उत्तर देणार? आणि आगामी काळात तो कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार? याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.