‘बिग बॉस १७’ हा शो दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अंकिता लोखंडे व विकी जैन हे या शो चे लोकप्रिय चेहरे झाले आहेत. खऱ्या आयुष्यात हे दोघे नवरा बायको असून त्यांच्यात कायमच प्रेम दिसून आले आहे. मात्र ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून यांचे अनेकदा खटके उडाले आहेत. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या जोडीमध्ये जोरदार भांडण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. कधीकधी तर त्यांच्यात मारामारीदेखील झाल्याचे दिसले आहे. अशातच ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यावरून पुन्हा एकदा त्यांच्याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे. (Bigg Boss 17 New Promo)
कलर्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. येत्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये अंकिता व विकीची आई येणार आहे. त्यांना पाहून दोघेही भावुक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आई व सासुला बघून अंकिता खूप भवूक झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत ती “आई तुमची खूप आठवण येत आहे” आणि “तुमच्यावर खूप प्रेम आहे” असे म्हणताना दिसत आहे. तर अंकिताची आई अंकिताला “तु खूप सक्षम आहेस आणि सक्षमपणे खेळूनच या घराच्या बाहेर निघ’ असं म्हणत आहे.
यापुढे विकीची आई विकीला पाहून खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विकीची आई त्यांना पाहून असे म्हणते की, “तुम्ही घरी असताना एकमेकांशी इतके छान वागत होतात, मात्र इथे येऊन तु विकीला चपलेने मारत आहेस.” यावर अंकिता “मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन” असं म्हणते. यावर विकीची आई पुन्हा रागावून “नाही. तु काही सांभाळत नाही आहेस” असं म्हणते.
मन्नारा-अंकिता यांच्या भांडणात अंकितला रडू आले होते तेव्हा विकिने अंकिताला जवळ घेत तिची समजूत काढली होती. विकी गेले काही दिवस चांगला खेळत आहे आणि यामुळे सलमानने त्याला मास्टरमाइंड असेही म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली अंकिताच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दर्शवल्याचेही दिसत आहे.