टीव्हीवरील लोकप्रिय ‘बिग बॉस’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमधील रोजचे नवनवीन ट्विस्ट, भांडण, त्याचबरोबर शोमधील वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या एण्ट्रीमुळे हा शो आणखीच रोमांचक झाला आहे. या शो मधील अंकिता लोखंडे व पती विकी जैन ही शोमध्ये सुरुवातीपासून कायमच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या गरोदरपणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता तिच्या प्रेग्नन्सीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात अंकिताची गरोदर चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर अंकिता हा शो सोडणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता असे काहीही होणार नाही. तिची गरोदर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे साहजिकच ती आई होणार नाहीये. ‘टाईम्स नाउ’च्या एका रिपोर्टनुसार तिच्या सगळ्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. अर्थात या चाचण्यांमधून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर ही अंकिताची वैयक्तिक बाब असल्यामुळे ही गोष्ट फार काळ लांबणीवर टाकता येणार नाही. असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी अंकिता जिग्ना वोरा व रिंकू धवन यांना तिची अवस्था सांगितली होती, त्यानंतर दोघेही खूप आनंदी झाले होते. तसेच नुकत्याच घरातून बाहेर पडलेल्या नावीद सोलेने अंकिताच्या मुलांचे नावही ठेवली असल्याचे सांगितले होते. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अंकिता ही गरोदर नाही हे सिद्ध झाले आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये अंकिता-विकी यांना घरात गेल्यापसून सहा आठवडे झाले आहेत आणि दोघेही चांगल्याप्रकारे खेळत आहेत. पण विकी दिमाग के मकान मध्ये गेल्यानंतर ते दोघे वैयक्तिक खेळ खेळताना दिसले. यानंतर विकीला त्याच्या चांगल्या खेळामुळे सलमानने मास्टर माईंडचा टॅगदेखील दिला आहे. आणि या रिपोर्टनंतर अंकितादेखील विकीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने खेळ खेळताना दिसत आहे.