शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : नवऱ्याला चप्पल फेकून मारली म्हणून अंकिता लोखंडेची सासू भडकली, म्हणाली “तु विकीला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 25, 2023 | 5:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 vicky jain mother disappoint on ankita lokhande for her fght video viral on social media

Bigg Boss 17 : नवऱ्याला चप्पल फेकून मारली म्हणून अंकिता लोखंडेची सासू भडकली, म्हणाली “तु विकीला...”

‘बिग बॉस १७’ हा शो दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. अंकिता लोखंडे व विकी जैन हे या शो चे लोकप्रिय चेहरे झाले आहेत. खऱ्या आयुष्यात हे दोघे नवरा बायको असून त्यांच्यात कायमच प्रेम दिसून आले आहे. मात्र ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून यांचे अनेकदा खटके उडाले आहेत. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या जोडीमध्ये जोरदार भांडण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. कधीकधी तर त्यांच्यात मारामारीदेखील झाल्याचे दिसले आहे. अशातच ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यावरून पुन्हा एकदा त्यांच्याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे. (Bigg Boss 17 New Promo)

कलर्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. येत्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये अंकिता व विकीची आई येणार आहे. त्यांना पाहून दोघेही भावुक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आई व सासुला बघून अंकिता खूप भवूक झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत ती “आई तुमची खूप आठवण येत आहे” आणि “तुमच्यावर खूप प्रेम आहे” असे म्हणताना दिसत आहे. तर अंकिताची आई अंकिताला “तु खूप सक्षम आहेस आणि सक्षमपणे खेळूनच या घराच्या बाहेर निघ’ असं म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा परदेशात डंका, बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सारत ठरली ‘सर्वोत्तम अभिनेत्री’, पुरस्कार स्वीकारताना भावुक

यापुढे विकीची आई विकीला पाहून खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विकीची आई त्यांना पाहून असे म्हणते की, “तुम्ही घरी असताना एकमेकांशी इतके छान वागत होतात, मात्र इथे येऊन तु विकीला चपलेने मारत आहेस.” यावर अंकिता “मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन” असं म्हणते. यावर विकीची आई पुन्हा रागावून “नाही. तु काही सांभाळत नाही आहेस” असं म्हणते.

आणखी वाचा – Bigg Boss 17 ; आई होणार नाही? ‘बिग बॉस’ फेम अंकिता लोखंडे हिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, रिपोर्ट आले समोर

मन्नारा-अंकिता यांच्या भांडणात अंकितला रडू आले होते तेव्हा विकिने अंकिताला जवळ घेत तिची समजूत काढली होती. विकी गेले काही दिवस चांगला खेळत आहे आणि यामुळे सलमानने त्याला मास्टरमाइंड असेही म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली अंकिताच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दर्शवल्याचेही दिसत आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17bollywood newsentertainment newsvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
katrina kaif angrily threaten to Vicky kaushal

विकी कौशलच्या 'या' गोष्टीवर भडकली होती कतरिना कैफ; लग्न न करण्याची धमकी देत म्हणालेली, “दोन दिवसांमध्येच…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.