बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नीना गुप्ता अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे वा फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. बरेचदा ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येते . अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ती विशेष चर्चेत आली आहे. (Neena Gupta On Relationship)
रणवीर अलावादियासह झालेल्या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी स्त्रीवादावर आपले मत व्यक्त केले. तिचे या मुलाखतीदरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या मुलाखतीदरम्यान त्यांनी मंटेनापासून मसाबाच्या घटस्फोटाबद्दलही भाष्य केलं. याशिवाय नीना गुप्ता या मुलाखतीदरम्यानच्या वैयक्तिक वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीवेळी नीना गुप्ता यांना रिलेशनशिप सल्ल्यासाठी विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सल्ला देण्यास नकार दिला आणि ती म्हणाली, ‘रिलेशनशिपचा सल्ला देणारी मी चुकीची व्यक्ती आहे. मी स्वतः नेहमीचं चुकीची माणसं निवडली आहेत, म्हणूनच कृपया मला याबद्दल विचारू नका, कारण मी चुकीचे उत्तर देईन”.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी नात्यांबाबत नेहमीच चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच मी तरुणांना याबाबतीत कोणताही चुकीचा सल्ला देणार नाही. मी माझ्या सध्याच्या पतीला भेटले तेव्हा तो आधीच विवाहित होता, त्यामुळे त्यावेळी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. कोणत्याही नात्यात येण्यापूर्वी स्वतःशी बोलणे महत्त्वाचे असते असं मला वाटतं” असंही त्या म्हणाल्या.
या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी तिची मुलगी मसाबाबद्दलही भाष्य केलं. याबाबत बोलताना नीना गुप्ता म्हणाली, “मी लेकीला मधु मंटेना यांच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला होता, हा केलेला आग्रह चुकीचा सिद्ध झाला आणि यामुळे माझ्या लेकीचं मन दुखावलं. मसाबाला यांनतर मोठा धक्का बसला होता” असंही त्या म्हणाल्या. मसाबा ही नीना व वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे.