बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण, मराठीतील मोठ्या चित्रपटाची केली घोषणा, पोस्टर समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 10, 2024 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Prajakta Mali made her production debut and she is recently announced her new film.

प्राजक्ता माळीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण, मराठीतील मोठ्या चित्रपटाची केली घोषणा, पोस्टर समोर

छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे रेशीमगाठ जुळवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आजवर मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व उत्तम सूत्रसंचालनाद्वारे चर्चेत असणारी अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियाद्वारे प्राजक्ता नेहमीच तिचे हटके व स्टायलिश फोटो शेअर करत असते.

अशातच तिने काल (०९ मे) शेअर केलेल्या फोटोमुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली. या फोटोमध्ये प्राजक्ता तिच्या आईसह काही कागदपत्रांवर सही कारतानाचे पाहायला मिळाले होते. प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत “२३ एप्रिल २०२४ रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी अजिबात नाही. या क्षणी माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे”. असं म्हटलं होतं. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाची घोषणा केली आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मिडियावर तिच्या आगामी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे नेमकं काय?, ‘या’ दिवसाचं महत्त्व आहे खूपच खास, जाणून घ्या…

या व्हिडीओखाली प्राजक्ताने असं म्हटलं आहे की, “’पॅनोरामा’चा पहिला बिग-बजेट ऐतिहासिक मराठी आणि ‘शिवोहम’ची पहिली निर्मिती असलेला चित्रपट ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येत आहे. कोणतीही पहिली गोष्ट ही नेहमीच खास असते. या क्षणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ‘पेशवे युग, नृत्य आणि संगीत’ची जादू तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आणखी वाट बघू शकत नाही. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूद्या.”

आणखी वाचा – “मावशी ऑन ड्युटी…”, लाडक्या भाचीबरोबर वेळ घालवत आहे जुई गडकरी, बालपणीच्या आठवणीतही रमली अन्…; म्हणाली…

प्राजक्ताच्या या घोषणेनंतर मराठी कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, अश्विनी कासार यांसारख्या कलाकारांनी तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्राजक्ताच्या अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पणानिमित्त कौतुक केले असून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.  

Tags: marathi actressmarathi entertainment newsprajakta mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Mugdha Karnik Angry

ATM मधून आल्या फाटलेल्या नोटा अन्…; 'पारू' फेम अभिनेत्रीचा संताप, फोटो शेअर करत म्हणाली, "बँक बदलण्याची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.