कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या शोमध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. अशातच गेले काही दिवस मुन्नवर हा चांगलाच चर्चेत आला आहे. मन्नारा चोप्रा व मुन्नवर हे त्यांच्या मैत्रीमुळे चर्चेत होते. अशातच आयेशा खानचे या शोमध्ये एण्ट्री झाली आणि तिच्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच आलेल्या एका नवीन प्रोमोमध्ये एका टास्कदरम्यान मुन्नवरवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. (Bigg Boss 17 New Promo)
अशातच या शोचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर अल असून या नवीन प्रोमोमुळेदेखील तो पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे विकी जैनने त्याच्यावर केलेले गंभीर आरोप. नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमदये विकी मुन्नवरवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. तर त्याच्या आरोपांपासून बचाव करण्यासाठी अंकिता लोखंडे मुन्नवरची साथ देत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एक कोर्ट आयोजित केले जाते आणि मुन्नवरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. आणि यावेळी मुन्नवरवर आरोपांच्या फैरी झाडल्या जातात.
यावेळी मुन्नवरवर आरोप करताना विकी जैनने असे म्हटले की, “त्याच्या आतापर्यंत नात्यांमध्ये हा प्रश्न पडतो की त्याने या घरात बांधलेली नाती आणि बाहेरून त्याच्याबद्दल कानावर आलेल्या गोष्टी या खऱ्या नक्की आहेत की नाहीत.” यानंतर अंकिता मुनव्वरची बाजू घेत असे म्हणते की, “आपण चुकीचे असल्याचे मुन्नवरने मान्य केले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो याआधी खरा होता किंवा आता खरा आहे. पण जेव्हा आयेशाचा विषय येतो तेव्हा हे मान्य केले पाहिजे की तो आता थोडा कमजोर झाला आहे. पण मुन्नवर हा खोटा नाही, हा माझा मुद्दा आहे.”
यापुढे विकी पुन्हा असे म्हणतो की, “नाझिलाचे नाव घेऊन मुन्नवरने शोमध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वत:ची एक चांगली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आयेशा येताच त्याची ही प्रतिमा खोटी पडली आहे. मुन्नवर त्याच्या बोलण्याने अनेकांवर त्याचा चांगला प्रभाव टाकतो आणि त्यामुळे खूप लोकांचे मन विरघळते.” दरम्यान, आता मुन्नवरवर झालेल्या आरोपांवर तो काय मत मांडणार? या शोमध्ये त्याचे स्थान टिकून राहणार की नाही? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले असून यासाठी सगळेच उत्सुक आहेत.