शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकांची नेहमीची…”, लेकीच्या लग्नात आई-वडिलांची खास पोज, मृण्मयी देशपांडे म्हणते, “नवऱ्याचं ऐकायचं नाही आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 29, 2023 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande Parents

"बायकांची नेहमीची…", लेकीच्या लग्नात आई-वडिलांची खास पोज, मृण्मयी देशपांडे म्हणते, "नवऱ्याचं ऐकायचं नाही आणि…"

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. कन्टेन्ट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरसह तिने लग्नगाठ बांधली. गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाचा शाही थाटमाट सिनेसृष्टीत विशेष चर्चेत राहिला. गौतमी-स्वानंद यांच्या लग्नाबरोबरचं त्यांच्या मेहंदी व संगीत सोहळ्यानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गौतमीने मेहंदीपासून हळदीपर्यंत अगदी वेगवेगळे लुक केलेले दिसून आले. ज्यामध्ये एकही मराठमोळा लुक नव्हता. त्यामुळे तिचा लग्नातील लुक कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र लग्नासाठी गौतमीने मराठमोळा लूक केला होता. (Mrunmayee Deshpande Parents)

गौतमीच्या लग्नसोहळ्यात भाव खाऊन गेली ती म्हणजे तिची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. बहिणीच्या लग्नसाठी मृण्मयी जय्यत तयारी करताना दिसली. लग्नाआधीपासूनचं ती गौतमीच्या संगीत, केळवणाच्या तयारीला लागली होती. गौतमीच्या मेहंदीला मृण्मयीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला होता. शिवाय बहिणीच्या लग्नातील मृण्मयीच्या हळदीच्या व लग्नाच्या लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनेक पोस्ट शेअर करत त्यांनी लग्नाच्या आठवणी फोटोरुपात कैद केल्या आहेत.

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार लग्न, या ठिकाणी शाही विवाहसोहळा होणार, रिसेप्शनही होणार अन्…

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आई-बाबांचे गोड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मृण्मयी व गौतमीचे आई-बाबा हटके पोज देत आहेत. हे फोटो शेअर करत मृण्मयीने त्या फोटोंचं विश्लेषण केलं आहे. मृण्मयीने पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, “बायकांची नेहेमीची पोज नवऱ्याचं ऐकायचं नाही. आई – बाबांची नेहेमीची पोज तू गप्प बस इती. आई – हाणीन धरून इती बाबा. स्थळ – गौतमीचं लग्न” असं म्हटलं आहे. मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे आई बाबा फोटो काढताना मज्जा मस्ती करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – मेघा घाडगे पुन्हा रुग्णालयात दाखल?, हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “करोना परत आला आहे कृपया…”

मृण्मयी व गौतमीचे आई-बाबा कलाविश्वपासून दूर आहेत. त्या दोघांचं राहणीमान साधं आहे हे त्यांच्या फोटोंवरुन कळून येत आहे. आजवर या देशपांडे सिस्टर्सने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

Tags: gautami deshpandegautami deshpande weddingmrunmayee deshpandemrunmayee deshpande parent photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

फुलांची सजावट, पाहुण्यांची गर्दी अन्…; मुग्धा वैशंपायनचं सासरी असं झालं स्वागत, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.