२०२३ या वर्षात ओटीटीवर एकापेक्षा एक वेबसीरिज आल्या. हे वर्ष मनोरंजनाच्या बाबतीत खूपच मनोरंजक होते. अशातच येत्या नवीन वर्षात ‘मिर्झापूर ३’ पासून ‘आश्रम ४’ सारख्या अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे सिकवेल्स प्रदर्शित होणार आहेत. तर जाणून घ्या येत्या नवीन वर्षात कोणत्या वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत.
(१) मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सिझन रिलीज झाले आहेत. दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यामुळे आता या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सीझन ३ हा येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

(२) द फॅमिली मॅन : मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ने सर्वांनाच वेड लावले. मनोज वाजपेयी यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना चकित केले. याचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. दरम्यान, या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात नवीन सीझनचे चाहूल पाहायला मिळाली होती. त्यामुळे या सीरिजचा तिसरा भाग पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. येत्या नवीन वर्षात हा नवीन सीझन येणार असल्याचे म्हटले जात आहे.

(३) पाताल लोक : ‘पाताल लोक’ या क्राईम थ्रिलर मालिकेचा पहिला सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता चाहते त्याच्या सीझन २ची वाट पाहत आहेत. येत्या नवीन वर्षात दूसरा सीझन येणार असल्याचे म्हटले जात आहे. पाताल लोक या वेबसीरिजला चाहत्यांनी खूपच लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे या नवीन सीझनसाठी चाहते उत्सुक आहेत.

(४) फर्जी : ‘फर्जी’ ही २०२३ मधील सर्वोत्कृष्ट वेबसीरिजपैकी एक होती. या सीरिजद्वारे शाहिद कपूरने ओटीटीवर पदार्पण केले. या सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता या सीरिजचा दूसरा भाग नवीन वर्षात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अनेकांना याची आतुरता लागली आहे.

(५) आश्रम : बॉबी देओलसाठी २०२३ हे लाभदायी ठरले. यावर्षी बॉबी देओल हा ‘अॅनिमल’ चित्रपटाने खूप चर्चेत आला. यापूर्वी त्याची ‘आश्रम’ ही वेबसीरिज खूपच गाजली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून येत्या नवीन वर्षात ‘आश्रम’चा चौथा सीझनही प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे येणारे नवीन वर्ष हे ओटीटी वापर कर्त्यांसाठी मनोरंजनाची चांगलीच पर्वणी असणार आहे. २०२४ मध्ये ‘आश्रम’, ‘पंचायत’, ‘फर्जी’, ‘द फॅमिली मॅन’सारख्या अनेक लोकप्रिय सीरिज प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहते या सीरिजच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.