शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा राडा, विकी जैन व सना खान यांच्यात कडाक्याचं भांडण, म्हणाला, “मी तुला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 24, 2023 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 vicky jain gets angry on sana raees khan over housework in the new promo

'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा राडा, विकी जैन व सना खान यांच्यात कडाक्याचं भांडण, म्हणाला, "मी तुला..."

‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व हे दिवसेंदिवस घरातील सदस्यांच्या भांडणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. घरात रोज कुठल्यातरी सदस्याचे कुणाशी तरी भांडण होतेच. अशातच आता विकी जैन याचे सना खानबरोबर भांडण होणार आहे. ‘बिग बॉस’चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये विकी सनावर खूप चिडलेला दिसत आहे. त्यामुळे आता घरात पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (Bigg Boss 17 New Promo)

या प्रोमोमध्ये, विकीला खुप राग आलेला दिसत आहे आणि या रागातच तो सनाला असे म्हणतो की, “तू काम न करता इथे बसली आहेस, गप्पा-गोष्टी करत आहेस. त्यामुळे आज तुला जेवण मिळणार नाही. मी इथे कुणाची कामे करायला आलो नाही. या घरात कुणी दुसऱ्यासाठी जेवण बनवायला नाही आलं आहे.” यावर सनाही रागाने म्हणते, “ठीक आहे, जेवण देऊ नकोस. मी भांडी धुणार नाही. जा, जेवण बनव. तुझ्यात इतका अहंकार आहे की, तू एका माणसाला उपाशी ठेवतो आहेस.” यावर मग विकीही ओरडून असे म्हणतो की, “स्वतःच्या हक्कासाठी अहंकार ठेवायला लागतो. नाहीतर लोक त्याचा फायदा घेतात”. यावर सना पुन्हा विकीला प्रतिउत्तर देत असे म्हणते की, “तू मला उपाशी ठेवणारा कोण आहेस? तू मला उपाशी ठेवू शकत नाहीस”. यावर विकी “तु काम केलं नाहीस तर तुला जेवण मिळणार नाही. त्यामुळे मी तुला उपाशी ठेवणार आहे” असे म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – नाना पाटेकर प्रकरणाला पुन्हा नवीन वळण, माजी आय.ए.एस. अधिकाऱ्याने दिली थेट धमकी, म्हणाला,”पुढच्या वेळी उत्तर प्रदेशात याल तर…”

दरम्यान घरात भांडी घासणे, जेवण बनवणे या कामांवरून त्यांच्यात हा वाद झाल्याचे दिसत आहे. सना एकही काम न करता घरातील इतर सदस्यांबरोबर फक्त गप्पा मारत आहे. हे पाहून विकीला राग येतो आणि तो तिला घरातील तिची कामे करण्यासाठी तिला सांगतो. पण ती याला नकार देते व त्याच्याबरोबर हुज्जत घालते. यावरून सना-विकी यांच्यात जोरदार भांडण होताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आजी देव देव करा”, डान्स करताना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या “तुझ्या देवाने…”

त्यामुळे आता येत्या भागात त्यांच्यातील भांडण मिटतं? की आणखी विकोपाला जातं? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच आठवड्याच्या शेवटी या भांडणावर सलमान खान काय प्रतिक्रिया देणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर येत्या आठवड्यात या घरात आणखी काही सदस्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे घरातील नवीन विरुद्ध जुने सदस्य यांच्यातही काही खटके उडणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Tags: bigg bossbigg boss 17entertainmententertainment newsSana Raees Khanvikcy jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Pushkar Jog On Marathi Film Producer

"हे योग्य नाही", पुष्कर जोगचा सई ताम्हणकरच्या चित्रपट निर्मात्यावर रोष, स्टोरी पोस्ट करत म्हणाला, "तुमच्या चित्रपटाची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.