सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आजी देव देव करा”, डान्स वरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या “तुझ्या देवाने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 24, 2023 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
satvya mulichi satvi mulgi fame actress aishwarya narkar answered to trollers

“आजी देव देव करा”, डान्स करताना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या “तुझ्या देवाने...”

नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपल्या सहजसुंदर अभिनयाने व सोज्वळ सौंदर्याने या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ऐश्वर्या सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्या सोशल मीडियावरदेखील चांगल्याच सक्रिय असतात. विविध लुक्समधील फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत ते कायम चर्चेत राहत असतात. अशातच त्यांच्या एका कृतीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (Actress Aishwarya Narkar Shared Dance Practice Video On Instagram)

नुकतंच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या डान्सचा सराव करताना दिसत आहेत. या डान्स सरावाची खास झलक त्यांनी या व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दरम्यान या व्हिडीओखाली काही नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया करत त्यांना ट्रोल केलं आहे. या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत “आजी देव देव करा” असं म्हटलं आहे. पण ऐश्वर्या यांनीही या नेटकऱ्याला “अरे बाळा, तुझ्या देवाने तुला सद्बुद्धी नाही का दिली?” असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – Video : हृदयाचे ठोके वाढणं, डोळ्यासमोर अंधार अन्…, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बहिणीची झाली वाईट अवस्था, म्हणाली, “मी एकटी…”

कलाकार म्हटलं की चाहत्यांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येतच असतात. पण अशा प्रतिक्रियांवर काही कलाकार दुर्लक्ष करतात तर काही त्यांना प्रतिउत्तर देतात. दरम्यान ऐश्वर्या यांनी याआधीही अनेकदा अशा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेंशन करत “कधी सुधारणार?” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील कलाकारांची पडद्यामागची केमिस्ट्री, कश्यप परुळेकर पल्लवी पाटीलला देतोय ड्रायव्हिंगचे धडे

दरम्यान, ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांना अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनेदेखील कमेंट करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. तर काही नेकऱ्यांनी “अप्रतिम, छान, सुंदर, तुम्ही खूप छान दिसता आणि नाचताही छान” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे देखील सांगितले आहे.

Tags: aishwarya narkarentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi serialsatvya mulichi saatvi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
ex ias officer threatened to marathi actor nana patekar through twitter video

नाना पाटेकर प्रकरणाला पुन्हा नवीन वळण, माजी आय.ए.एस. अधिकाऱ्याने दिली थेट धमकी, म्हणाला,"पुढच्या वेळी उत्तर प्रदेशात याल तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.