सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकमेकांपासून वेगळं…”, अंकिता लोखंडेबरोबर घटस्फोट घेण्यावरुन विकी जैनचं भाष्य, म्हणाला, “आमच्यामध्ये झालेलं भांडण…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss 17 Vicky jain comment on divorce with ankita lokhande and he said everything is fine between us see the details

"एकमेकांपासून वेगळं...", अंकिता लोखंडेबरोबर घटस्फोट घेण्यावरुन विकी जैनचं भाष्य, म्हणाला, "आमच्यामध्ये झालेलं भांडण..."

‘बिग बॉस १७’हा शो आता संपला असला तरीदेखील या शोविषयी व शोमधील कलाकारांविषयी अजूनही चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. या शोमधून बाहेर आलेले सगळेच स्पर्धक आता सर्वत्र मुलाखती देत आहेत आणि या मुलाखतींमधून अनेक मोठे खुलासे केले आहेत. अशातच या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन ही पती-पत्नीची जोडी विशेष चर्चेत आली होती.

‘बिग बॉस १७’मध्ये या दोघांमध्ये अनेकदा वाद, भांडणे झाली. कधीकधी त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की त्यांच्यात मारामारीदेखील झाली होती. त्यात अनेकदा दोघांच्या वैवाहिक आयुष्यावरही प्रश्नचिन्हे उपस्थित केले गेले. अशातच विकी जैनने त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विकीने असे म्हटले की, “त्याचे आणि अंकिताचे नाते खूप सुंदर आहे. आमच्या नात्यात आमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही मित्रांसारखी मजा करतो.”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाचा – ९ महिन्यांची गरोदर, विरार ट्रेनमधून ढकलून दिलं अन्…; मंजिर ओकने सांगितलेला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणालेली, “मार्केटिंगची नोकरी करताना…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “‘बिग बॉस १७’च्या घरात आम्ही काही अनोळखी लोकांबरोबर राहत होतो आणि आमच्यात झालेले काही प्रकार हे त्या परिस्थितीमुळेच झाले. पण यापुढे तसे होणार नाही असं मला वाटतं. आम्हा दोघांनाही एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही. आमच्यामध्ये सर्व काही ठीक चाललं आहे. अंकिता आणि माझा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे.”

आणखी वाचा – अक्षय कुमार, विकी कौशलपाठोपाठ आता शाहिद कपूरही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, नेमका काय असणार चित्रपट?

दरम्यान, अंकिता-विकी यांना ‘बिग बॉस’ शोमुळे चांगलीच लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे त्यांना आता आणखी नवीन शोदेखील मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहतेमंडळी उत्सुक आहेत.

Tags: ankita lokhandebigg boss 17bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsvicky jainअंकिता लोखंडेबिग बॉस १७बॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
Next Post
vicky jain mother

आता सासूही झाली स्टार, सूनेमुळे सतत कॅमेऱ्यासमोर येत आहे विकी जैनची आई, एकता कपूरच्या मालिकेत काम करण्यावरुन म्हणाल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.