‘बिग बॉस १७’ मध्ये, विकी जैनची आई रंजना जैन यांनी सून अंकिता लोखंडेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली. ज्या दिवशी त्या या ‘बिग बॉस’च्या घरात आल्या त्या दिवसापासून त्यांचे मिमिक्री व्हिडीओ बनवले जाऊ लागले. त्यानंतर फॅमिली वीकनंतर त्या अधिकच लोकप्रिय झाल्या. ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्येही त्या सुनेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी सलमान खाननेही असे सांगितले की, “अंकितापेक्षा तिची सासू देशभरात जास्त लोकप्रिय आहे”. नुकत्याच रंजना जैन त्यांचा मुलगा विकी जैनसह विमानतळावर दिसल्या. यावेळी त्या आपल्या मुलाबरोबर बिलासपूरला निघाल्या होत्या. (Vicky Jain Mother)
‘बिग बॉस १७’ मध्ये, विकी जैन व त्याची आई रंजना जैन यांनी अंकिता लोखंडेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली. रंजना जैन या जेव्हा विमानतळावर स्पॉट झाल्या तेव्हा एका पापाराजीने त्यांना विचारले की, “आई, विक्की भाईचा खेळ कसा होता?” तर त्यावर त्या म्हणाल्या, “खूप छान. पहीला क्रमांक”. मग एकाने विचारले, “ऑफर आली तर चित्रपट करणार का?” तर यावर रंजना यांनी उत्तर देत म्हटलं, “घरी सांभाळण्यासाठी दोन मुले आहेत”.
यावेळी एक पापाराजी म्हणाला, “मम्मी, तू मोठी स्टार झाली आहेस”, यावर त्या हसल्या. मग एकाने विचारले, “मम्मी, तू कोणते शो करणार आहेस का? बिग बॉस १८ची ऑफर आली तर?” या प्रश्नांवर रंजना यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते, तिने आश्चर्याने भुवया उंचावल्या आणि हसत प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले. मग एकाने विचारले की, “मम्मी, तू एकता कपूरचा शो करणार का?”.
सदर व्हिडीओमध्ये रंजना यांच्यासह विकी जैनदेखील दिसत होता. जो काही बोलण्याआधीच आपल्या आईला धरुन पुढे घेऊन जात होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, “विकी जैन घाबरत आहे की आंटी पुन्हा सत्य सांगतील”, तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “रंजनाजी यांनी कोमोलिकालाही मागे टाकलं”. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ती विकीसारखीच खूप मजेदार आई आहे”.