बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय कुमार, विकी कौशलपाठोपाठ आता शाहिद कपूरही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, नेमका काय असणार चित्रपट?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
After Akshay Kumar and Vicky Kaushal now Shahid Kapoor will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj what exactly will the film be

अक्षय कुमार, विकी कौशलपाठोपाठ आता शाहिद कपूरही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, नेमका काय असणार चित्रपट?

सध्या मनोरंजन विश्वात ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. मराठीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे आणि प्रेक्षकांकडूनही या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतानाचे पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडलाही ऐतिहासिक चित्रपटांची भुरळ पडली आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक बॉलिवूड कलाकार महापुरुषांच्या भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक आहे.

मध्यंतरी महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक चांगलाच व्हायरल झाला होता. याबरोबरच ‘सॅम बहादुर’सारख्या ताकदीच्या भूमिका पेलणारा विकी कौशलही लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणितो अभिनेता म्हणजे शाहिद कपूर.

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

आणखी वाचा – Video : कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकरचं नवऱ्यासह कौतुकास्पद काम, अन्नदानही केलं अन्…; म्हणाली, “दु:ख दूर करण्यासाठी…”

‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार ‘ओह माय गॉड २’चे दिग्दर्शक अमित राय हे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक भव्य चित्रपट घेऊन येणार आहेत आणि या चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी शाहीद कपूरची निवड केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप चित्रपटाच्या घोषणेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भव्य चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

आणखी वाचा – “खूप लाज वाटते अन्…”, संदीप रेड्डी यांच्या टीकेनंतर आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीची घेतली बाजू, माफी मागत म्हणाला…

दरम्यान, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’हा शाहिदचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिदबरोबर अभिनेत्री  क्रिती सेनॉनही आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी व शाहीदच्या आगामी ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.  

Tags: अक्षय कुमारशाहिद कपूरमनोरंजन बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड बातमीबॉलिवूड चित्रपटविकी कौशलakshay kumarBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood moviesbollywood newsentertainment newsshahid kapoorvicky kaushal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Girija Prabhu New Home

गिरीजा प्रभूच्या नव्या घराबाहेरील आकर्षक नेमप्लेटने वेधलं लक्ष, कलाकारांकडून कौतुक अन्…; म्हणाली, "अखेर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.