रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2025 | 2:51 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Gauahar Khan on suniel Shetty

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

गरोदरपणातील प्रत्येक स्त्रीचा प्रवास, आव्हानं वेगळी असतात. बाळाला जन्म देतानाही नॉर्मल डिलिव्हरी होणार की सी-सेक्शन होणार याचंही स्त्रियांना वेगळंच दडपण असतं. बऱ्याचदा शारीरिक व मानसिक त्रास लक्षात घेतात डॉक्टप सी-सेक्शन करण्याचाही सल्ला देतात. मात्र डिलिव्हरी दोघांपैकी कोणत्याही पद्धतीने झाली तरी सहन करावा लागणारा त्रास काही तुलनेत समानच असतो. मध्यंतरी याच विषयाला धरुन अभिनेते सुनिल शेट्टी यांनी एक विधान केलं होतं. सी-सेक्शन आरामदायक असतं असं सुनिल यांनी म्हटलं होतं. आता यावरच अभिनेत्री गौहर खानने संताप व्यक्त केला आहे. तसेच सुनिल यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Gauahar Khan on suniel Shetty)

सी-सेक्शन म्हणजे आरामदायी हे सुनिल यांचं वक्तव्य गौहरला अजिबात आवडलं नाही. याआधीही त्यांच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा रंगली. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया आल्या. मात्र सुनिल यांनी पुन्हा यावर बोलणं टाळलं होतं. आता गौहरने त्यांना या संदर्भात सुनावलं आहे. तिने युट्युबद्वारे एक व्लॉग शेअर केला. या व्लॉगमध्ये गौहरने तिच्या गरोदरपणाबाबत सांगितलं. दरम्यान सुनिल यांच्या कमेंटचा उल्लेख केला. यावर तिने स्वतःचं मत मांडलं.

आणखी वाचा – आधी गर्भपात, पुन्हा गरोदर अन्…; दुसऱ्यांदा आई होणाऱ्या गौहर खानला रडू कोसळलं, अशी हालत होती की…

गौहर म्हणाली, “मी ओरडून हे विचारु इच्छिते की, सुनिल असं बोलूच कसे शकतात?. याबाबत चुकीची माहिती कशी काय देऊ शकता?. ज्यांनी कधी गरोदरपण अनुभवलंच नाही, सी-सेक्शनचं दुःख काय आहे? हे माहितीच नाही, पाहिलं नाही मग असं विधान केलंच कसं?”. गौहरने अगदी बेधडकपणे सुनिल यांना अनेक सवाल केले. तिच्या या वक्तव्यावर काहींनी सहमतीही दर्शवली आहे. सी-सेक्शन किती वेदना देणारं असतं? हे तिने स्वतःही अनुभवलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं ४०शीमध्येच धक्कादायक निधन, बसने प्रवास करतानाच मृत्यूने कवटाळलं अन्…

गौहरने २०२०मध्ये लग्न केलं. त्यानंतर तिने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर नऊ आठवड्यांमध्येच तिचा गर्भपात झाला. तिच्यासाठी हे न विसरण्यासारखं होतं. त्यानंतर पुन्हा गरोदर राहत तिने २०२३मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. जेहान असं तिने मुलाचं नाव ठेवलं आहे. आता ती पुन्हा एकदा गरोदर आहे. लवकरच ती चाहत्यांना गुडन्यूज देईल.

Tags: bollywood newsentertainment newsSunil Shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Radhika Apte Motherhood

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, "इथं काम करणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.