रविवार, ऑगस्ट 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2025 | 11:05 am
in Women
Reading Time: 3 mins read
google-news
Vaishnavi Hagawane Death

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. सध्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींनाही अटक करण्यात आलं आहे. सध्या वैष्णवी या प्रकरणाने न्यायालयाची पायरी चढली आहे. तर वैष्णवीच्या चिमुकल्या बाळाची जबाबदारीही तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे कस्पटे कुटुंबाकडे सोपविण्यात आली आहे. अशातच त्या नऊ महिन्याच्या बाळाची ओढाताण होताना पाहायला मिळत आहे.

आईविना आपलं साधं पानही हलत नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला आपली हवी असते. तिच्याबरोबर, तिच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. पण ज्यांच्यावरील आईचे छत्र हरपले असेल त्यांच्यासाठी हा प्रवास अर्थात कठीण आहे. आणि वैष्णवीच्या त्या नऊ महिन्याच्या चिमुरड्यावर ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. दिवस-रात्र आईच्या अंगा-खांद्यावर खेळणार हे बाळ आता आईविना पोरकं झालं आहे. त्या नऊ महिन्याच्या बालकाला आपली आई आता या जगात नाही हे देखील कळत नसताना त्याच्यावर पोरकं होण्याची वेळ आहे. एकीकडे आई नाही, तर वडील आईच्या मृत्यूमुळे तुरुंगात आहेत, हे जेव्हा त्या बाळाला कळेल तेव्हा तो हे सगळं कसं सहन करेल.

आणखी वाचा – बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

View this post on Instagram

A post shared by Yogesh Patil Kurdukr (@___yogesh.12)

सध्या वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी तिच्या आई-वडिलांकडे आहे. अशातच त्या बाळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सगळ्यांच मन हेलावलं आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या चित्रपटाच्या कार्यक्रमावेळी दीपालीने वैष्णवी प्रकरणावर माध्यमांसमोर भाष्य केलं. या प्रकरणावरुन तिने आरोपींविरोधात संताप व्यक्त केला तर वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली. आणि या इच्छेप्रमाणे दीपालीने कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी वैष्णवीच्या त्या लेकाला पाहून तिच्याही भावना दाटून आल्या.

आणखी वाचा – ‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं, “निशब्द. ज्यावेळी अशी दुर्दैवी घटना घडते त्या कुटुंबाचा विचार करण्याचं सोडून राज्यामध्ये आपण कसे एकमेकाला चुकीचे ठरवू यातच सर्व गुंतलेले आहोत. मी कुटुंबाला ज्यावेळी भेट दिली त्यावेळी वैष्णवीच्या आई वडिलांना पाहून अत्यंत वेदना झाल्या. जेव्हा तिच्या त्या लहानशा बालकाला आपण भेटतो तेव्हा खरंच निशब्द. आरोपींना कठोर शिक्षा मिळणारच आहे पण माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, वैष्णवीला व तिच्या त्या लहानशा बाळाला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र या. यावेळी राजकारण नको”.

Tags: dowry casepune crime newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
Next Post
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्...; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.