शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून ओरीचा काढता पाय, फक्त एका दिवसातच घरातून पडला बाहेर कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 27, 2023 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 orhan awatramani aka orry leave salman khan show in only one day

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'मधून ओरीचा काढता पाय, फक्त एका दिवसातच घरातून पडला बाहेर कारण...

‘बिग बॉस १७’ चे यंदाचे पर्व शो मधील भांडणं, वादविवाद, मारामारी यामुळे चांगलेच गाजत आहे. अशातच यंदाच्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमानने खानझादी व मन्नारा चोप्रा यांना फटकारले तर दुसरीकडे अंकिता व विकीच्या आईने दोघांना समजावले. त्याचबरोबर ओरी उर्फ ओराहन अवत्रामणीने घरात प्रवेश केला. त्याच्या येण्याने घरातील वातावरणचं बदलून गेले. त्याने घरातील सदस्यांबरोबर मज्जामस्ती केली. त्याचबरोबर त्याच्या आयुष्याबद्दल काही आश्चर्यचकित करणारे खुलासेही केले. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील हा वीकेण्ड का वार चांगलाच गाजला. (Orhan Awatramani Aka Orry Leave Bigg Boss 17)

दरम्यान, ओरीने बी बॉस च्या घरातून एका दिवसातच काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने घरात तो वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येत असल्याचे अनेकांना वाटले. मात्र तो घरातील सदस्यांचे मनोरंजन करण्यासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. रविवारच्या भागात ‘जस्ट चिल विथ सोहेल आणि अरबाज’ हे खास सेशन झालं. ज्यामध्ये अरबाज खान व सोहेल खानने कुटुंबातील सदस्यांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर काही सदस्यांची मजादेखील घेतात. या भागाच्या शेवटी अरबाज-सोहेल सांगतात की, “ते प्रत्येकवेळी घरात एक नवीन सदस्य घेऊन येतात. पण यावेळी ते घरातून एक सदस्य बाहेर घेऊन जात आहेत आणि तो सदस्य म्हणजे ओरी.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, “तुला नाही येत…”

यापुढे ते असं म्हणतात की, “ओरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नाही, तर वीकेण्डला तुमचं मनोरंजन करण्यासाठी आला होता.” हे ऐकून घरातील सदस्य आश्चर्यचकित झाले. यानंतर अरबाज-सोहेलबरोबर ओरीने कुटुंबाचा निरोप घेतला. ओरी फक्त एकच दिवस घरात राहिला. मात्र एका दिवसातच त्याने घरातील सदस्यांची व प्रेक्षकांची मनं जिंकली.

आणखी वाचा – मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम कलाकारांची धमाल ट्रिप, मज्जा-मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

दरम्यान ऑरी हा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्याच्या चर्चा शनिवारीच सुरु झाल्या होत्या. कारण शनिवारी रात्री तो ‘द आर्चीज’च्या कार्यक्रमात स्पॉट झाला होता. त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तो ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

Tags: bigg boss 17bigg boss 17 updateentertainment newsentertainment updateorry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
sunny deol troll for laughing

राजकुमार कोहली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात सनी देओल हसत राहिला अन्…; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, "निर्लज्ज मृत व्यक्तीच्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.