‘बिग बॉस १७’ चे यंदाचे पर्व शो मधील भांडणं, वादविवाद, मारामारी यामुळे चांगलेच गाजत आहे. अशातच यंदाच्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमानने खानझादी व मन्नारा चोप्रा यांना फटकारले तर दुसरीकडे अंकिता व विकीच्या आईने दोघांना समजावले. त्याचबरोबर ओरी उर्फ ओराहन अवत्रामणीने घरात प्रवेश केला. त्याच्या येण्याने घरातील वातावरणचं बदलून गेले. त्याने घरातील सदस्यांबरोबर मज्जामस्ती केली. त्याचबरोबर त्याच्या आयुष्याबद्दल काही आश्चर्यचकित करणारे खुलासेही केले. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील हा वीकेण्ड का वार चांगलाच गाजला. (Orhan Awatramani Aka Orry Leave Bigg Boss 17)
दरम्यान, ओरीने बी बॉस च्या घरातून एका दिवसातच काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने घरात तो वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येत असल्याचे अनेकांना वाटले. मात्र तो घरातील सदस्यांचे मनोरंजन करण्यासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. रविवारच्या भागात ‘जस्ट चिल विथ सोहेल आणि अरबाज’ हे खास सेशन झालं. ज्यामध्ये अरबाज खान व सोहेल खानने कुटुंबातील सदस्यांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर काही सदस्यांची मजादेखील घेतात. या भागाच्या शेवटी अरबाज-सोहेल सांगतात की, “ते प्रत्येकवेळी घरात एक नवीन सदस्य घेऊन येतात. पण यावेळी ते घरातून एक सदस्य बाहेर घेऊन जात आहेत आणि तो सदस्य म्हणजे ओरी.”
आणखी वाचा – प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, “तुला नाही येत…”
यापुढे ते असं म्हणतात की, “ओरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नाही, तर वीकेण्डला तुमचं मनोरंजन करण्यासाठी आला होता.” हे ऐकून घरातील सदस्य आश्चर्यचकित झाले. यानंतर अरबाज-सोहेलबरोबर ओरीने कुटुंबाचा निरोप घेतला. ओरी फक्त एकच दिवस घरात राहिला. मात्र एका दिवसातच त्याने घरातील सदस्यांची व प्रेक्षकांची मनं जिंकली.
दरम्यान ऑरी हा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्याच्या चर्चा शनिवारीच सुरु झाल्या होत्या. कारण शनिवारी रात्री तो ‘द आर्चीज’च्या कार्यक्रमात स्पॉट झाला होता. त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तो ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.