Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सध्या एका टर्निंग पॉइंटवर आलेलं आहे. या शोचा फिनाले जवळ आला असल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचा शेवट जसजसा जवळ येत आहे तसा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, इशा मालवीय, अंकिता लोखंडे, विकी जैन या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात ‘फॅमिली वीक’ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटंबातील जवळची व्यक्ती भेटायला आल्याचे पाहायला मिळत आहे. विकीची आई व अंकिताची आई या दोघांनीही ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. विकी व अंकिताला भेटण्यासाठी त्या दोघी आल्या होत्या. या भेटीदरम्यानही अंकिता व विकीच्या आईमध्ये खटके उडाले होते. यावरुन अंकिताच्या चाहत्यांनी विकीच्या आईला ट्रोलही केले.
विकी जैनची आई ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती देत भाष्य केलं. अंकिताच्या सासूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर अंकिताच्या सासूचा व्हायरल व्हिडीओ पोस्ट करत अंकिताला पाठिंबा दर्शविला आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत “मीडिया तुमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंकिताची सासू तिला कशी मदत करते, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. रिएलिटी शो येतील आणि जातील, पण कुटुंब कायम बरोबर असतं. मला वाटतं अंकिताने हा शो जिंकावा. पण यासाठी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याची किंमत मोजावी लागू नये” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. कंगना व अंकिताने ‘मणकर्णिका’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघींमध्ये मैत्री झाली. अंकिता व विकीच्या लग्नालाही कंगनाने हजेरी लावली होती.