रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नांदेडमध्ये पराठा, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, “पंजाबी धाब्यावर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actor sankarshan karhade visited nanded gurdwara and shared pictures of himself eating lassi and aloo ka paratha on instagram.

नांदेडमध्ये पराठ, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, "पंजाबी धाब्यावर..."

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही मध्यमांत काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अचंबित करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने आजवर अनेक चित्रपटांतून त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र जी मराठी वाहिनी वरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून चांगलाच नावरूपाला आला. लॉकडाऊनच्या काळात त्याने लिहिलेल्या कवितांमुळे व सादरीकरणांमुळे तर तो चांगलाच प्रसिद्ध झाला. याच लॉकडाऊनच्या काळात त्याने अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशीबरोबर कवितांचे अनेक ऑनलाइन कार्यक्रम केले. आणि यातूनच संकर्षण व्हाया स्पृहा या कवितांच्या कार्यक्रमाचा जन्म झाला. (Sankarshan Karhade On Instagram)

संकर्षण व स्पृहा हे दोघेही एक उत्तम कलाकार, एक उत्तम कवी व कवयित्री म्हणून चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या कवितांचे असंख्य चाहते आहेत. संकर्षण व स्पृहा यांच्या कवितांची ख्याती केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर परदेशातही आहे. त्याचदरम्यान या कार्यक्रमाचे सध्या महाराष्ट्रात काही प्रयोग चालू आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा परभणीमध्ये प्रयोग झाला होता. तेव्हा फटाक्यांची आतिषबाजी अन् सनई चौघड्यांच्या स्वरात संकर्षण व स्पृहा यांचे स्वागत करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – ‘बॉइज’ चित्रपट फेम अभिनेता करणार दिग्दर्शनात पदार्पण, ‘या’ नाटकाद्वारे नव्या इनिंगला सुरुवात

अभिनेता संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संप्रकात राहत असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कविता, किस्से, किंवा काही अनुभव वगैरे शेअर करत असतो. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळतो.  सध्या रंगभूमीवर संकर्षणचे ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ असे तीन नाटकं चालू आहेत आणि या तिन्ही नाटकांना प्रेक्षकांकडूनदेखील हाऊसफूल प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी त्यांचा अपमान…”, अंकिता लोखंडेच्या आईला रागामध्ये फोन केल्यानंतर विकी जैनच्या आईचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, “त्यांचा कोणत्याही प्रकारे…”

अशातच आता परभणीनंतर संकर्षण नांदेडमध्ये गेला आहे. नांदेडमध्ये जाताच अभिनेत्याने सकाळी नांदेडमधील गुरूद्वाराचे दर्शन घेतलं आणि त्यांतर पंजाबी धाब्यावर लस्सी, आलू का परांठावर ताव मारला. दरम्यान गुरुद्वारामधील दर्शन घेतानाचे व लस्सी अन् आलू का पराठावर ताव मारतानाचे काही क्षण त्याने सोशल मीडियादवाफरे शेअर केले आहेत.  यावेळी त्याच्याबरोबर त्याचे काही सहकरीदेखील होते. दरम्यान या फोटोला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.    

Tags: संकर्षण कऱ्हाडेमराठी अभिनेतामराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीentertainemnt newsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Prasad Oak Home

लाकडी काम, हटके इंटेरियर अन्…; इतकं आलिशान आणि मोठं आहे प्रसाद ओकचं घर, सगळं काही आहे खास, पाहा फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.