मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तिची सासू तिला…”, विकी जैनच्या आईने अंकिता लोखंडेला दिलेली वागणूक पाहून कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “कुटुंबाला तोडण्याचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 10, 2024 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "तिची सासू तिला…", विकी जैनच्या आईने अंकिता लोखंडेला दिलेली वागणूक पाहून कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, "कुटुंबाला तोडण्याचा…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सध्या एका टर्निंग पॉइंटवर आलेलं आहे. या शोचा फिनाले जवळ आला असल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचा शेवट जसजसा जवळ येत आहे तसा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, इशा मालवीय, अंकिता लोखंडे, विकी जैन या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

सध्या ‘बिग बॉस’च्या घरात ‘फॅमिली वीक’ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना त्यांच्या कुटंबातील जवळची व्यक्ती भेटायला आल्याचे पाहायला मिळत आहे. विकीची आई व अंकिताची आई या दोघांनीही ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. विकी व अंकिताला भेटण्यासाठी त्या दोघी आल्या होत्या. या भेटीदरम्यानही अंकिता व विकीच्या आईमध्ये खटके उडाले होते. यावरुन अंकिताच्या चाहत्यांनी विकीच्या आईला ट्रोलही केले.

आणखी वाचा – लाकडी काम, हटके इंटेरियर अन्…; इतकं आलिशान आणि मोठं आहे प्रसाद ओकचं घर, सगळं काही आहे खास, पाहा फोटो

विकी जैनची आई ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती देत भाष्य केलं. अंकिताच्या सासूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर अंकिताच्या सासूचा व्हायरल व्हिडीओ पोस्ट करत अंकिताला पाठिंबा दर्शविला आहे.

आणखी वाचा – नांदेडमध्ये पराठा, लस्सीवर संकर्षण कऱ्हाडेने मारला ताव, गुरुद्वारामध्ये दर्शनही घेतलं, फोटो शेअर करत म्हणाला, “पंजाबी धाब्यावर…”

हा व्हिडीओ पोस्ट करत “मीडिया तुमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंकिताची सासू तिला कशी मदत करते, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. रिएलिटी शो येतील आणि जातील, पण कुटुंब कायम बरोबर असतं. मला वाटतं अंकिताने हा शो जिंकावा. पण यासाठी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याची किंमत मोजावी लागू नये” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. कंगना व अंकिताने ‘मणकर्णिका’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघींमध्ये मैत्री झाली. अंकिता व विकीच्या लग्नालाही कंगनाने हजेरी लावली होती.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentkangana ranaut
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
tharla tar mag fame actress jui gadkari shared instagram story with thought post viral on social media

"दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, "स्वतःच्या प्रगतीकडे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.